Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ; पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची समस्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट

Xtreme Today   07-10-2026 19:35:54   725911000

महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ; पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची समस्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतली भेट 

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - राज्यात 32 जिल्ह्यात दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. जर विचार केला, तर 80 टक्के तालुके दुष्काळप्रभावित आहेत. म्हणून विशेष मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राला करावी अशी विनंती केली. आम्ही प्रस्ताव पाठवतोय त्यावर केंद्राची टीम तात्काळ यावी अशी विनंती केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. “आपल्याला कल्पना आहे की,गृहमंत्री हे एनडीआरएफचे अध्यक्ष असतात. दुष्काळाच्या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीसंदर्भात जे काही आपले प्रस्ताव असतात, ते या ग्रुपकडे पाठवले जातात. या बैठकीची अध्यक्षता अमित शाह करतात. म्हणून आपण एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवलेला. त्याची कल्पना देण्यासाठी मी आलेलो. मी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्राच प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची समस्या आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं.

 

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी राज्यातील गंभीर अशा दुष्काळाची चर्चा केली. केंद्रीय पाहणी पथक  8 तारखेपासून महाराष्ट्रात येईल. ही टीम 8 ते 11 विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन दुष्काळी परिस्थिती काय आहे, याची  तपासणी करेल. ते आपला रिपोर्ट एनडीआरएफला सादर करतील. त्यांनी पाठवलेला रिपोर्ट आपण पाठवलेले प्रस्ताव यावर एनडीआरएफ निर्णय घेईल. त्या दृष्टीने वेगाने निर्णय होत आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहून विशेष मदत केंद्र सरकारने करावी. गृहमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. नियमात बसवून जास्तीत जास्त मदत भारत सरकार करेल असं आश्वासन दिलेलं आहे, सॅटलाइट इमेजिंगच्या मुद्यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. “शिवराज सिंह चौहान म्हणाले की, विविध निकषांपैकी तो एक निकष आहे. तो निकष पूर्ण झाला नाही, तर आम्ही विचार करु. ट्रिगर 1 मध्ये 265 तालुके दिले. या निकषांव्यतिरिक्त काही तालुक्यांसंदर्भात टेक्निकल अडचण होती. पाऊस पडलेला आहे. पण पावसातील खंड यामुळे पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यासाठी सुद्ध उपसमिती पाहणी करेल. 20 तालुके असे आहेत ते जरी यादीत आलेले नसले तरी दुष्काळाची मदत केली जाईल” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती