Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राज्यात श्री गणेश विसर्जन शिस्तबद्ध रीतीने सुरू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीर्वाद मागितला

Xtreme Today   25-09-2026 22:06:28   592843864

राज्यात श्री गणेश विसर्जन शिस्तबद्ध रीतीने सुरू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीर्वाद मागितला

 

मुंबई/पुणे (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील श्री गणेश विसर्जन शिस्तबद्ध रीतीने सुरू झाले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… मुंबई, पुण्यात विसर्जनाची जय्यत तयारी, भाविकांची गर्दी दिसून येत आहे.

आज बाप्पाला निरोप देण्यासाठी, मुंबईसह पुणे, अहिल्यानगर, नाशिक, कोल्हापूर, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर, नागपूर आदी शहरात हा सोहळा संपन्न होत आहे. भाविकाची मोठी गर्दी बाप्पाला निरोप देण्यासाठी नतमस्तक झाल्याचे चित्र दिसून येत आहे. 

 

मुंबईतील गिरगाव चौपाटीवर गणेशमूर्तींचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना बाप्पा सुबुद्धी देवो आणि कुबुद्धीचे विसर्जन होवो असा आशीवार्द बाप्पाकडे मागितला आहे. गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी जय्यत तयारी सुरू आहे. मोठ्या गणपतींसाठी स्वतंत्र मार्ग, समुद्रात कृत्रिम ब्रिजसह पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त बघायला मिळतोय. मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने होणाऱ्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी परिसरात गणेशमूर्तींसाठी स्वतंत्र रांगा दोन तयार करण्यात आल्या आहेत.चार फुटांखालील गणपतींसाठी डाव्या बाजूला, तर मोठ्या सार्वजनिक मंडळांच्या गणपतींसाठी उजव्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.  पीओपीच्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जित होऊ नयेत, यासाठी कृत्रिम तलावांचीही उभारणी करण्यात आली आहे.

 

पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची पुण्याचा राजा अशी ओळख आहे. गणेशाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी बघायला मिळतं होती. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावनिक झाले. प्रशासन यंत्रणा सज्ज आहे, त्यासोबतच पोलिसांची मोठी कुमक दिसून आली.

 

आज अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्या लाडक्या बाप्पाचं निरोप देण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत. मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक 9 वाजता सुरु झाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिस यांच्याकडुन करण्यात आली जोरदार तयारी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त भावनिक झाले. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीला देशभरात नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. गणेशाच्या विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती