Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

पुण्यात ‘बापट’ इफेक्ट, पोलिसांनी 150 गणेश मंडळांना रस्त्यावरून मिरवणूक परवानगी नाकारली; ध्वनी प्रदुषणावरून मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली

Xtreme Today   22-09-2026 20:30:01   285143795

पुण्यात ‘बापट’ इफेक्ट, पोलिसांनी 150 गणेश मंडळांना रस्त्यावरून मिरवणूक परवानगी नाकारली; ध्वनी प्रदुषणावरून मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यात काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी ध्वनीप्रदुषणावरून गणेश मंडळाच्या रस्त्यावरील मिरवणुकीला विरोध केला होता. या विरोधामुळे विद्यानंद बापट यांना मारहाणही सहन करावी लागली. परंतु आता त्यांच्या मागणीला पोलीस प्रशासनाकडून ग्रीन सिग्नल दिल्याचे दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी थेट 150 गणेश मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुकीला परवानगी नाकारली आहे. विद्यानंद बापट यांनी नवी मोठी मागणी केली आहे. त्यात आता ध्वनी प्रदुषणावरून मुंबई हायकोर्टाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे.

 

राज्यातील गणेशोत्सव आणि इतर धार्मिक सोहळ्यात होणाऱ्या ध्वनीप्रदुषणवरून नागरिकांनी काही आठवड्यांपूर्वी आवाज उठवला. विशेष म्हणजे पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून प्रशासनाला जाब विचारला. राज्यातील काही भागात डिजेवर बंदी देखील घालण्यात आली आहे. त्यानंतर सोमवारी सण-उत्सव काळातील ध्वनी प्रदूषणावरून मुंबई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. न्या. जी. एस. कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने ही दखल घेतली. आज या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचिकेवरून कोर्ट कोणता आदेश कोणता देणार. याकडे लक्ष लागलं आहे. याचदरम्यान मुंबई हायकोर्टाच्या सुमोटो याचिकेवरून सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी आता थेट खुल्या वातावरणात वाजवण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरवरच बंदीची मागणी केली आहे. 

 

‘लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. देसाई यांच्या 85 सालच्या कमिटीच्या शिफारसीमध्ये ही बाब नमूद आहे. महाराष्ट्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही ही बाब नमूद आहे. नंतर फिरवला असेल. खुल्या वातावरणील लाऊडस्पीकरवर बंदी आणली पाहिजे’. दुसरीकडे पोलिसांकडून कारवाई केली जात नसल्याचा आरोप होत आहे, यावर बापट म्हणाले, पोलिसांनी आधीच दक्षता घेतली पाहिजे. त्यांनी आधीच रोखण्याची योजना आखली पाहिजे. खरंतर ही समस्या मुळापासून सोडवली पाहिजे. खुल्या वातावरणात लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी दिल्यानंतर नैतिक अधिकार फारसा राहत नाही. सणांच्या दिवसात अंमलबजावणीत शिथिलता येते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून कारवाई करणे गरेजेचे आहे.’ असे विद्याधर बापट म्हणाले आहेत.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती