आपत्ती व्यवस्थापन! हीच आहे का मुंबईची सुरक्षा!!
Xtreme Today
15-09-2026 20:41:31
93264912
आपत्ती व्यवस्थापन! हीच आहे का मुंबईची सुरक्षा!!
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेटवे ऑफ इंडियाला उरण, मांडवा येथून हजारो लोक दररोज दाखल होत असतात, त्यांच्या सामानाची तपासणी करण्यासाठी पोलीस चौकीत तपासणी यंत्र लावले आहे, ते गेले ५ महिन्यापासून बंदच आहे,याच पोलीस चौकी मधून रायगड जिल्ह्यातून अतिरेक्यांनी तर काही नागरिकांनी विध्वंसक सामान आणून मुंबईत भयानक स्पोट करून हादरवली होती,अनेकाचे मृत्यू होऊन नुकसान ही झाले होते.अशा प्रकारची पुनरावृत्ती मुंबईत होऊन नागरिकांचे जीवन उध्वस्त होऊ नये असे वाटते.
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ आणि ज्येष्ठ पत्रकार सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील हे अलीकडे मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे अलिबागला येण्यासाठी गेले होते त्यांना सुरक्षा व्यवस्थेबद्दल शंका आल्याने त्यांनी चौकशी केली असता त्यांना जे चित्र दिसले त्याचे छायाचित्र त्यांनी स्वतः काढलेले, या वृत्तासोबत दिलेले आहे तसे गेल्या पाच महिन्यापासून ते याचा पाठपुरावा करीत आहे परंतु तेथील सुरक्षा कर्मचारी पोलीस यंत्रणेने त्यांना अजून पर्यंत खरे कारण काही सांगितले नाही टोलवाटवली केल्या जात आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन तज्ञ म्हणून हीच का आहे मुंबईची खरी सुरक्षा व्यवस्था हा प्रश्न निर्माण झाला आहे.
आम्ही अनेक वेळा ही मशीन केव्हा सुरू होणार याची चौकशी करतो उत्तर नेहमीप्रमाणे मेकॅनिक आजच येणार अशी टोलवा टोलवी होते.आणि त्याला आज ५ महिने बरोबर झाले, आपत्ती कधीही केव्हाही येऊ शकते या गोष्टीची जाण मुंबई पोलिसांना नाही असे वाटते राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जरा तातडीने मुंबई पोलीस प्रमुख यांना गेटवेला या मशीन इकडे लक्ष देण्यास पाठवावे तसेच व्हिजिट आणि सोबत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यांनाही पाठवावे. मुंबई आपली आणि सर्वांची आहे, तिच्या सुरक्षा साठी गांभीर्याने विचार तऱ्हेने व्हावा. असे ज्येष्ठ पत्रकार तथा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ म्हणून विनंती करावीशी वाटते तसेच मांडवा, उरण, एलिफंटा येथून प्रवास करणाऱ्यांनी हे पहावे, आणि मुख्यमंत्री महोदयांना कळवावे. असे आवाहन -जीवनदूत, रायगड पोलीस, डॉ. जयपाल पाटील अलिबाग मो.9270446777 /8623975277 यांनी केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.