आश्रमशाळा-हॉस्टेलना अन्नसुरक्षेचे धडे; पोषण आहाराबाबत FDA चा उपक्रम, आयुक्त तुकाराम मुंढेंचा पुढाकार
Xtreme Today
11-09-2026 19:30:16
38762965
आश्रमशाळा-हॉस्टेलना अन्नसुरक्षेचे धडे; पोषण आहाराबाबत FDA चा उपक्रम, आयुक्त तुकाराम मुंढेंचा पुढाकार
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - एफडीए विभाग राज्यात धडाकेबाज कामगिरी करत आहे. अशातच 'एफडीए' विभागाने ठाण्यात मार्गदर्शनाचा उपक्रम राबवला विशेष म्हणजे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये हा उपक्रम राबण्यात आले. आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अपर आयुक्त कार्यालयांतर्गत असलेल्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील अन्नसुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने नुकतेच विशेष मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका आणि गृहपाल यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे अन्नसुरक्षेचे धडे देण्यात आले. अन्नसुरक्षेबाबत काही अडचणी आल्यास जवळच्या एफडीए कार्यालयाला भेट देऊन शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही एफडीएकडून करण्यात आले आहे.
आदिवासी विकास विभागाच्या ठाणे अपर आयुक्त कार्यालयांतर्गत १२८ सरकारी आश्रमशाळा, ७३ अनुदानित आश्रमशाळा आणि ९० सरकारी वसतिगृहे येतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या सुरक्षिततेसाठी एफडीएकडून हा विशेष उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार, तसेच कॅन्टीन आणि स्वयंपाकगृहातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत घ्यावयाच्या आवश्यक उपाययोजना आणि खबरदारी याविषयी एफडीएचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांनी मार्गदर्शन केले.
१२८ सरकारी आश्रमशाळा, ७३ अनुदानित आश्रमशाळा आणि ९० सरकारी वसतिगृहे आदींमध्ये यासाठी मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका आणि गृहपाल या सत्रात सहभागी झाले होते. एफडीएकडून नोंदणी व परवाना कसा घ्यावा, याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम आणि सहायक आयुक्त राहुल शिर्के उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.