Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राजकीय नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद करा - विद्यानंद बापट

Xtreme Today   07-09-2026 22:07:21   49638645

राजकीय नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद करा - विद्यानंद बापट

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - विद्यानंद बापट यांनी डीजेविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यभरात वातावरण तापलेलं असतानाच आता बापट यांनी राजकीय नेत्यांचं देखील टेन्शन वाढवलं आहे. त्यांनी आता थेट  आपला मोर्च हा राजकीय नेत्यांच्या सभा आणि मिरवणुकीकडे वळवला आहे. नेत्यांच्या सभा, मिरवणूका, लग्नकार्य आणि ज्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होते त्या ठिकाणी डीजे बंद असावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

 

सण उत्सवाच्या काळात डीजे असावा की नाही? यावरून राज्यात दोन मतप्रवाह पडल्याचं दिसून येत आहे, काही जण डीजेचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण सण उत्सवाच्या काळात होणाऱ्या डीजेच्या वापराला विरोध करताना दिसत आहेत. पुण्यामधील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी सणसमारंभात वाजवण्यात येणाऱ्या डीजेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी डीजेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. राजकीय क्षेत्रातले लोकांनी निवडून येणाऱ्याला आनंद आहे, मात्र त्यांनी सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण करणे हे योग्य नाही. लग्नकार्य आणि इतर उत्सवात डीजे वाजवीणे म्हणजे एकाने वाजविले की दुसरे वाजवतात. डीजे विरोधात मी टोकाची भूमिका घेत नाही, मी फक्त त्याच्यावरती सोल्युशन सांगतोय.  सध्या एक नरेटिव्ह सेट केला जातोय, सध्याचे उत्सव केले जातात तेच उत्सव खरे आहेत, असं पसरवलं जात आहे.  या उत्सवात कसलाही बदल होणार नाही, असा नरेटिव्ह सेट केला जात आहे. यामुळे कुणाचं मन किंवा भावना दुखावली जात आहे, हेच मुळात हास्यपद आहे, असं यावेळी बापट यांनी म्हटलं आहे.

 

डीजेमुळे लोकांचे कान आणि छाती दुखते ही बाब निर्विवाद आहे.  तुमचा आनंद हा इतरांसाठी शिक्षा नसायला हवा. उत्सव हे काल सुसंगत आणि निरुपवाद असावेत असा आमचा आग्रह आहे.  काळानुरूप बदल झाले नाहीत ही विज्ञानाची बाब आहे. मला ज्यांनी मारहाण केली, त्या संतोष चव्हाण यांना संग्राम भंडारे यांनी सोन्याचे कडे दिले, मात्र मला माहिती आहे, ते हे सर्व प्रसिद्धीसाठी करत आहेत. परंतु मला माझं काम करायचं ,आहे. दहीहंडीत माझा AI टेक्नॉलॉजी वर एक व्हिडिओ बनवून नाचताना दाखवला जातोय. मात्र बघणाऱ्याने सदसदविवेक बुद्धी शाबूत ठेवावी. मुख्यमंत्री म्हणालेत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे व्हावेत, यावर चर्चेने तोडगा निघू शकतो. मुख्यमंत्र्यांनी म्हणाले तर हे होऊ शकतं. असं विद्यानंद बापट यांनी म्हटलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती