ज्येष्ठ पत्रकारांचे आयुष्य अंधारातच; त्यांचे वर्तमान आणि भविष्य उज्वल करणार : डॉ. जयपाल पाटील
Xtreme Today
05-09-2026 13:44:33
9558539
ज्येष्ठ पत्रकारांचे आयुष्य अंधारातच; त्यांचे वर्तमान आणि भविष्य उज्वल करणार : डॉ. जयपाल पाटील

पिंपरी (प्रतिनिधी) - अहोरात्र आपली लेखणी झिजवतो अशा आणि ज्यांचे वर्तमान व भविष्य अंधकारमय आहे अशा सर्व पत्रकार समाजासाठी, त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अंधार दूर करण्यासाठी सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून महत्त्वाचे कार्य हाती घेण्यात आले आहे. विशेषतः ज्येष्ठ पत्रकारांची स्थिती तर त्याहून गंभीर असल्याची खंत व्यक्त करून सरकारचे त्याच्याकडे पूर्ण दूर्लक्ष्य होत आहे. त्यासाठी आज त्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित लढा उभारण्याची गरज ' सिनियर जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र' या स़घटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ. जयपाल पाटील यांनी प्राधिकरण ( निगडी ) येथे बोलून दाखवली.
सीनियर जर्नालिस्ट असोसिएशन या संघटनेच्या आकुर्डी-निगडी प्राधिकरणातील उत्तर पुणे जिल्हा-पिंपरी-चिंचवड कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी उत्तर पुणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस संजय जोशी, पुणे शहर जिल्हाध्यक्ष मिलिंद वैद्य, सरचिटणीस चंद्रकांत कांबळे उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष डाँ. जयपाल पाटील यांच्याहस्ते संघटनेच्या पिंपरी चिंचवड कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या बैठकीत उत्तर पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड शहर कार्यकारणी पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. उत्तर पुणे जिल्हा अध्यक्षपदी - विजय सुराणा, सरचिटणीस - सदानंद शेवाळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष - उत्तम कुटे, उपाध्यक्ष - विजय न्यायाधीश, पुणे शहर कार्याध्यक्ष - अनिल पाडाळे, उत्तर भारतीय पत्रकार आघाडी प्रमुख - संजय विश्वकर्मा, डिजिटल सल्लागार - नितीन येलमार म्हणून सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
आपल्या प्रमुख भाषणात डाँ. पाटील यांनी संघटन अधिकाधीक बळकट करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकारांचे आर्थिक प्रश्न, आरोग्यविषयक, अधिस्विकृती कार्ड, पेन्शन, प्रवास सवलती याबाबत विस्तृत अशी माहिती दिली. केंद्र व राज्य शासनाकडे या प्रश्नांचा आपण पाठपुरावा करणार असल्याचे सांगून येत्या नोव्हेंबर 2026 या महिन्यात पुणे अथवा पिंपरी-चिंचवड येथे संघटनेच्या वतीने पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन घेतले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रदेश सरचिटणीस संजय जोशी यांनी संघटनेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. सीनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून जात जातपात-धर्म-भाषा तसेच मुद्रित अथवा डिजिटल माध्यमे माध्यमातील सर्वांना आपल्या संघटनेचे सन्माननीय सदस्य म्हणून सहभागी करून घेतली जाईल. शहरी व ग्रामीण अशा सर्व ज्येष्ठ पत्रकारांसाठी ही संघटना कार्यरत करण्यात आली असून पत्रकारांच्या कोणत्याही संघटनेत सहभागी असलेल्या सभासदासही आम्ही सभासद म्हणून स्वागत करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
लवकरच संघटनेचे मुंबई विभाग कार्यालय अंधेरी परिसरात सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले व महाराष्ट्रातून येणाऱ्या पत्रकार आणि त्यांच्या नातेवाईकांना संघटनेच्या वतीने राहण्याची व्यवस्था म्हणून अल्प दरात स्वतःच्या विश्राम गृहाची उभारणी केली जाणार असल्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
शिर्डी (अहिल्यानगर ) येथे उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची येत्या 24 सप्टेंबर रोजी बैठक, विदर्भ विभाग बैठक व अहिल्यानगर कार्यकारणी जाहीर केली जाणार असून नऊ जिल्ह्यांत नवे पदाधिकारी नियुक्त करून कामकाज सुरू झाल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी सर्व सभासदांना व पदाधिकारी यांना अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, सरचिटणीस संजय जोशी आणि पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.मिलिंद वैद्य यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. तसेच काही सभासदांनी सर्व पूर्तता केली असल्याने त्यांना संघटनेचे ओळखपत्र देण्यात आले.
पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी संघटनेचेच्या जिल्ह्यातील कार्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील संघटन मजबूत केले जाणार असून लवकरच पुणे शहर व दक्षिण पुणे जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा शहर सरचिटणीस चंद्रकांत कांबळे यांनी उपस्थित पत्रकारांचे आभार मानले. बैठकीसाठी हाँल उपलब्ध करून दिल्याबद्दल ओझर्डे इन्स्टिटयूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
बैठकीस ज्येष्ठ पत्रकार राजन वडके, संदीप पवार, छायाचित्रकार सचिन ठाकर, व्हिडिओ जर्नालिस्ट मिलिंद टेमकर यांसह अनेक सदस्य पत्रकार उपस्थित होते.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.