Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Xtreme Today   31-08-2026 19:46:56   283765245

डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे विशेष प्रतिनिधी - सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी डीजेवर बंदी घातली जावी अशी मागणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आवाहन केलं आहे. डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

 

 मी जेव्हा या कार्यक्रमातून बाहेर पडेल तेव्हा मीडिया मला पुण्यासंदर्भात एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही गणेशोत्सवाचं बोललात मग गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न मला नक्की विचारला जाणार आहे. पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो. पुण्यामध्येच ही क्षमता आहे. की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, डीजेच्या वादात न पडता, पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सास्कृतीक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो? असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती