सिनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन; महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील आणि सरचिटणीस संजय जोशी यांची निवड
Xtreme Today
20-08-2026 14:39:53
4533007
सिनियर जर्नालिस्ट असोसिएशनच्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन; महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील आणि सरचिटणीस संजय जोशी यांची निवड

पुणे, ता. 19 : ज्येष्ठ पत्रकारांसाठी देशात व राज्यामध्ये कार्यरत असलेल्या 'सिनीअर जर्नालिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र' च्या पुणे कार्यालयाचे उद्घाटन आज (बुधवारी ) करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील आजी-माजी पदाधिकारी व सभासदांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, सरचिटणीस संजय जोशी, माजी अध्यक्ष व विद्यमान कार्यकारी सदस्य राम अग्रवाल, पुणे जिल्हा व शहर अध्यक्ष मिलिंद वैद्य, सचिव चंद्रकांत कांबळे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख यादवराव पावसे, छत्रपती संभाजीनगरचे संजय व्यापारी, पनवेलचे अविनाश पाटील तसेच संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुनील रावडे आणि ॲड.ओंकार माने, ज्येष्ठ पत्रकार संदीप पवार, राजन वडके तसेच अन्य सभासद उपस्थित होते.
बैठकीत विविध जिल्ह्यातील व विभागीय शाखांचे आलेले प्रस्ताव, ज्येष्ठ पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर व सरकार दरबारी दरबारी मांडावयाच्या प्रस्तावांविषयी सविस्तर चर्चा झाली. डॉ. जयपाल पाटिल, राम अग्रवाल, संजय जोशी, यादवराव पावसे, मिलिंद वैद्य, अविनाश पाटिल आदिंनी विचार मांडले.
ज्येष्ठ पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी प्राध्या. डॉ. जयपाल पाटील सरचिटणीस संजय जोशी यांची म्हणून निवड
महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याच्या अडचणी, पेन्शन योजनेतील जाचक अटीमुळे त्यांना येणाऱ्या अडचणी आणि होणारा मनस्ताप त्यामुळे येणारे आजारपण सोडविण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांना संघटनेची आवश्यकता होती. सध्या महाराष्ट्रात जेष्ठ पत्रकारांची संख्या वाढत आहे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी दैनिक लोकमतचे वरिष्ठ संपादक श्री.राम अग्रवाल व दैनिक सकाळचे श्री. संजय जोशी यांनी सन २०२३/३२/४४१ नुसार धर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे नोंदणी केली होती, त्याची आज झालेल्या बैठकीत अलिबागचे जेष्ठ पत्रकार तथा आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची सर्वानुमते महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांच्या शुभ हस्ते पुणे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, संस्थेचे नोंदणी पत्र माजी अध्यक्ष श्री राम अग्रवाल यांनी त्यांना दिले. दिनांक 19 ऑगस्ट रोजी इस्टिम न्यूज इंडिया, स्वरुप कॉम्प्लेक्स, एरंडवना येथे झालेल्या बैठकीत प्रास्ताविकात संजय जोशी म्हणाले राम अग्रवाल दैनिक लोकमतमध्ये कार्यरत असताना पत्रकारांसाठी गृहनिर्माण प्रकल्प केले पाहिजेत व ज्येष्ठ पत्रकारांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा म्हणून संस्थेची नोंदणी केली होती. त्यानंतर पुण्यात स्थायिक झाल्यानंतर श्री अग्रवाल यांना राज्यसभेत सल्लागार समिती मध्ये जावे लागल्याने संस्थेचे कार्य होऊ शकले नाही. परंतु त्यांनी देश पातळीवरील प्रकाशकांची संघटना लिपा, स्मॉल अँड मिडीयम न्यूज पेपर ऑफ इंडिया, भारतीय पत्रकार संघटना ए.आय.जे. अशा पत्रकारांच्या अनेक संघटनांमध्ये उच्च पदावर राहून पत्रकारांसाठी मोलाचे कार्य केलेले, छायाचित्रकार, लेखक, कवी, संपादक, अभ्यासू पत्रकार प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांची महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली असून ज्येष्ठ पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कार्य करण्याचे सर्वांनी मिळून ठरविले आहे. संघटनेच्या कार्यालयासाठी एक्स्ट्रीम न्यूज इंडियाच्या कार्यालयात श्री श्रीकृष्ण आयाचीत यांनी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार यावेळी श्री संजय जोशी यांनी मांडले, त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. यावेळी संघटनेबाबत श्री यादवराव पावसे, श्रीयुत मिलिंद वैद्य श्री अविनाश पाटील, श्री राम अग्रवाल यांनी मौलिक सूचना दिल्या, यावेळी डॉ. जयपाल पाटील यांनी शासनमान्य आपली संघटना असुन महाराष्ट्र शासनाच्या विविध समित्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार म्हणून आपल्यातील लोकांना संधी मिळाली पाहिजे, त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याची तातडीने मदत झाली पाहिजे आधिस्वीकृती पत्रकार होण्यासाठी, तसेच पेन्शन योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन निवेदन देऊन वेळ पडली तर आंदोलन, मोर्चे काढून ज्येष्ठ पत्रकारांना योग्य सन्मान व मागण्या मागून पत्रकार क्षेत्रात नव्याने येणाऱ्यांना कार्यशाळा, ग्रामीण भागातील पत्रकारांचा यथोचित सन्मान, ज्येष्ठ संघटनेत प्रिंट मीडिया सोबत सोशल मीडियातील सरकार मान्य युट्युब चॅनेल चा सहभाग,आपत्ती व सुरक्षा विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन ज्येष्ठ पत्रकारांच्या मुला मुलींना माझे अलिबाग तालुक्यातील सामरी येथील वात्सल्य वृद्धाश्रमाचे मालक मित्र श्री. संतोष पाटील यांनी शिवतेज अल्कलाइन शुद्ध पाणी प्रकल्प उभारला असून त्याची एजन्सी देण्यात येईल, व त्यामुळे त्यांना आर्थिक मदत होईल. आपणावर कधीही आपत्ती येऊ शकत नाही याची काळजी घ्यावी असा मोलाचा सल्ला डॉ. जयपाल पाटील यांनी दिला.
येत्या दिनांक 8 ते 13 सप्टेंबर रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी माउंट अबू राजस्थान यांच्या तर्फे राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनात यावे असे निमंत्रण देऊन नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र संघटनेचे राज्यव्यापी संमेलन पुणे येथे होणार असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र सरचिटणीस पदी श्री संजय जोशी उत्तर महाराष्ट्र प्रमुख पदी यादवराव पावसे, पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्री. मिलिंद वैद्य सचिव श्री चंद्रकांत कांबळे, खजिनदारपदी सौ. भारती शहा, सल्लागारपदी अडवोकेट सुनील रावडे आणि एडवोकेट ओमकार माने, रायगड जिल्हा सरचिटणीस पदी श्री. अविनाश पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आली.या बैठकीस छत्रपती संभाजी नगरचे संजय व्यापारी, श्रीहरी पाथर्डी, श्रीकृष्ण अवधूत पुणे, श्रीमती मेधा कोल्हटकर रत्नागिरी, श्री. श्रीकांत सहस्रबुद्धे महाड इत्यादी जण उपस्थित होते. सल्लागार अडवोकेट श्री. सुनील रावडे यांनी आभार प्रदर्शन केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.