Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

मुंबईसह महाराष्ट्रात आता रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्यात येणार

Xtreme Today   12-08-2026 22:33:57   128437013

मुंबईसह महाराष्ट्रात आता रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्यात येणार 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईसह महाराष्ट्रात आता रिक्षा आणि टॅक्सी चालकाला मराठी येत नसल्यास त्याचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. मोटर व्हेहिकल ऐक्ट 1988 मध्ये बदल करून मोटर अमेंडमेंट रूल्स 2026 आजपासून लागू होणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली.

 

 

या नियमाप्रमाणे जर रिक्षा किंवा टॅक्सी चालकाला मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान नसेल, जुजबी मराठी देखील बोलता येत नसेल तर त्याला आधीच एका महिन्याची नोटीस देण्यात येईल. त्या एका महिन्यात देखील चालकाने मराठी शिकली नाही, तर त्याचे लायसन्स 3 महिन्याच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येणार आहे. यानंतर देखील चालक मराठी शिकत नसेल तर त्याचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची तरदूत या कायद्यामध्ये असणार आहे. आजच हा नवीन कायदा लागू केला जाणार आहे. परिवहन विभागातर्फे शासनाच्या विधी आणि न्याय विभागाला कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, तो मंजूर झाल्याने आज शासन निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मराठीच्या मोहिमेला आता कायद्याचे संरक्षण असणार आहे.

 

राज्यात 1989 मधीलचं हा कायदा आहे, जूना कायदा आहे. परंतु या कायद्याचा योग्य वापर अधिकाऱ्यांकडून केला जात नव्हता. या कायद्यात महाराष्ट्रात जर तुम्हाला व्यावसाय करायचा असेल तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे, असं नमूद आहे. आम्ही काही महिन्यांआधी या कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरु करण्याचे आदेश दिले. यावेळी कुणाला मराठी येत नसेल, तर त्याच्यावर अन्याय नको म्हणून आम्ही मराठी शिकण्यासाठी कालावधी दिला होता. 15 ऑगस्टपर्यंत मराठी शिका, असं सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतरही अजूनही मराठी येत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. सरकारच्या सूचनेनंतर अनेक चालक मराठी शिकत आहेत. अनेकांनी मराठी शिकली. परंतु आजही अनेक रिक्षा आणि टॅक्सी चालक आम्ही मराठी शिकणार नाही, अशा पद्धतीची भाषा वापरत आहेत. आम्ही ही त्यांची मग्रुरी मोडून काढण्यासाठीच या कायद्यात सुधारणा केली, असं प्रताप सरनाईकांनी सांगितले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती