xtreme2day 13-07-2026 23:06:45 68943808
संतश्रेष्ठ चैतन्य मूर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला; सगळीकडे भंडारा-खोबऱ्याची उधळण, दर्शनासाठी अलोट गर्दी जेजुरी (प्रतिनिधी) - श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला आहे.सायंकाळी 6.15 मिनिटांच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन झालं.त्यानंतर मुक्त भंडार खोबऱ्याची उधळण करत या पालखी सोहळ्याचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी भक्तीमय वातावरणाने जेजुरी नगरी दुमदुमून निघाली. भंडारा उधळत,टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानोबा - तुकाराम"च्या जयघोषात सोन्याच्या जेजुरीत माऊलींचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं. यंदाही "माऊली आणि खंडेरायची भेट"झाल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत असून जेजुरीत वैष्णवांचा महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. सासवडकर यांचा निरोप घेऊन श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोन्याच्या जेजुरीत विसावला आहे. सायंकाळी 6.15 मिनिटांच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जेजुरी नगरीत आगमन झालं.पालखी आगमनाच्या क्षणी भक्तांनी भंडारा उधळत माऊलींचे दर्शन घेतले आणि विठ्ठलनामाच्या गजरात परिसर दुमदुमून गेला.पालखी आगमनामुळे जेजुरीत भक्ती,श्रद्धा आणि उत्साहाचे अनोखे वातावरण निर्माण झाले आहे.हजारो वारकरी आणि भाविकांनी माऊलींच्या दर्शनाचा लाभ घेतला. दरम्यान, सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोल नाका परिसरात आज झालेल्या टेम्पो अपघात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सासवड-जेजुरी रस्त्यावर, बेलसर टोल नाक्यापासून जेजुरीच्या दिशेने सुमारे ५०० मीटर अंतरावर, हॉटेल शिपदीप लॉजिंगसमोर हा गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालक आजारी असल्याने त्याचं नियंत्रण सुटून ही दुर्घटना घडली.