Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखा कार्यकारिणीची बैठक

xtreme2day   02-07-2026 20:42:15   2651059

ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्यानगर येथे ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखा कार्यकारिणीची बैठक 

जालना / पुणे ( प्रतिनिधी ) - अहिल्यानगर येथे ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र शाखा कार्यकारिणीची बैठक येत्या पाच जुलै रोजी होत आहे. त्यासाठी राष्ट्रीय सचिव व आपत्ती व्यवस्थापन तज्ञ डॉक्टर जयपाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार तसेच कार्यकारणी मधील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. 

 

देशभरात जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शन व आरोग्य योजना बाबत अनेक समस्या असल्यामुळे केरळ राज्यात प्रथम या वरील विषयाला केंद्र सरकारकडून मागण्यांसाठी भारतातले ज्येष्ठ पत्रकार यांनी अनेक संघटनात कार्यरत राहून पत्रकारांचे प्रश्न सोडविले. अशांनी एकत्र येऊन भारतातील ज्येष्ठ पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्थापना झाली त्याची महाराष्ट्र शाखेची स्थापना करण्यात येत आहे. संपुर्ण देशातील ज्येष्ठ पत्रकाराच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी केरळ त्रिवेनपुरम येथे स्थापन झालेल्या जेष्ठ पत्रकार महासंघ भारतातफें दिनांक 14 व15 मार्च रोजी वायसो होटेल बॅगिनी जुना गोवा येथे आयोजित करण्यात आले होते.

 

या दोन दिवस संमेलनात जेष्ठ पत्रकाराच्या सामाजिक सुरक्षा परिस्थितीवर चर्चासत्र, व्यवसाय सत्र,गोवा मंत्रालय मंत्री व पत्रकार विभाग सचिवांचे मार्गदर्शन झाले . गोवा जेष्ठ पत्रकार संघटनेच्या सहयोगाने होत असून यांची जबाबदारी संघटनेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती सुहासिनी प्रभुगावकर,श्री.गुरुदास सावल, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य ,श्री.सुभाष नाईक,राष्ट्रीय परिषद सदस्य असे आहेत. या फेडरेशनचे केरळ, श्री.के.पी.विजयकुमार, राष्ट्रीय खजिनदार , महाराष्ट्र डॉ.जयपाल पाटील, राष्ट्रीय सचिव मो. 9270446777, तामिळनाडू श्री.आर. रंग राज, , ओडिसा, श्री.कान्हू नंदा , तेलंगणा श्री.आनंदम पुलिपलुपुला,राष्ट्रीय उपाध्यक्ष , आंध्र प्रदेश डॉ.जनार्दन ,मध्य प्रदेश, श्री.चंदर प्रकाश भारद्वाज , कर्नाटक श्रीमती शांताकुमारी, राष्ट्रीय सचिव ,नवी दिल्ली श्री.संदीप दीक्षित राष्ट्रीय अध्यक्ष ,केरळ श्री.एन.पी.चेक्कुटी राष्ट्रीय सरचिटणीस हे राष्ट्रीय पदाधिकारी असून गोवा येथील बैठकीत संघटनेच्या विविध मागण्यांसोबत भारत सरकार व राज्य सरकारचे मंत्री जेव्हा परदेशात अभ्यास दौऱ्यावर जातील त्यावेळी सोबत त्यांच्या जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकारांना सोबत न्यावे अशी मागणी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारणीत प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले.

 

अहिल्यानगर येथील सावेडी रोडवरील माऊली संकुल सभागृहात रविवार दिनांक 5 जुलै रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत होणार असून यासाठी फेडरेशनचे राष्ट्रीय सचिव प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यासाठी महाराष्ट्र प्रभारी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती सुहासिनी प्रभू गावकर यांच्या मान्यतेने फेडरेशनचे जालना येथील ज्येष्ठ पत्रकार, महाराष्ट्र अध्यक्ष श्री. ओम प्रकाश शिंदे मोबा.8668935288 आणि पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार सरचिटणीस श्री. संजय जोशी मोबा.9307895379 यांनी महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना आवाहन केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती