Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले

xtreme2day   29-06-2026 20:08:45   116238077

चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या गाजलेल्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी 26 जून रोजी न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले होते. या निकालानंतर राज्यभरातून समाधान व्यक्त केले जात असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात या निर्णयाचे स्वागत केले व नराधमांवर आपल्याला कारवाई करायची असेल. जरब बसवायची असेल तर वेळेत न्याय मिळणं गरजेचं आहे. न्यायालयाने या प्रकरणात एक नवं उदाहरण मांडलं आहे असे म्हटले. 

 

अधिवेशनात माहिती देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. याआधी 26 जून रोजी न्यायालयाने भीमराव कांबळेला दोषी ठरवलं होतं. दरम्यान, भीमराव कांबळेला दोषी ठरवल्यानंर सर्वत्र समाधान व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पावसाळी अधिवेशनात या निकालाबाबत समाधान व्यक्त केले आहे. अतिशय कमी कालावधीत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. पुरावे गोळा केले. न्यायालयानेही सलग सुनावणी घेऊन निकाल दिला, असे म्हणत फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यात आला. पोलिसांनी अल्पावधीत महत्त्वाचे पुरावे गोळा केले आणि न्यायालयाने सलग सुनावणी घेत जलदगतीने निकाल दिला. त्यामुळे पीडित कुटुंबाला वेळेत न्याय मिळाला, असे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, 16 मे 2026 रोजी या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण झाली आणि अल्पावधीत साक्षी नोंदवण्यास सुरुवात झाली. केवळ काही दिवसांत 55 साक्षीदारांची तपासणी आणि उलटतपासणी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर 26 जून रोजी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आणि 29 जून रोजी न्यायालयाने त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली.

 

या प्रकरणात न्यायालयाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष न्यायमूर्ती एस. आर. साळुंखे यांचे आभार मानले. सलग सुनावणी घेण्यासाठी त्यांनी स्वतःच्या सुट्ट्याही रद्द केल्या, असे सांगत त्यांनी न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. तसेच, या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गील आणि त्यांच्या पथकाचेही मुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले. “अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वेळेत आणि कठोर शिक्षा झाली तर समाजात कायद्याचा धाक निर्माण होतो. या प्रकरणात पोलीस आणि न्यायालयाने एक आदर्श निर्माण केला आहे,” असे म्हणत त्यांनी तपास यंत्रणा आणि न्यायसंस्थेचे आभार व्यक्त केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती