अलिबागच्या अर्जुन पाटीलचा आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये प्रथम क्रमांक; रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
xtreme2day
27-05-2026 20:28:35
6341626
अलिबागच्या अर्जुन पाटीलचा आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये प्रथम क्रमांक; रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

अलिबाग ( डॉ. जयपाल पाटील, ब्युरो चीफ यांजकडून ) - पनवेल येथील न्यू हॉरायझन स्कूल, इयत्ता 4 थी मध्ये शिकणारा व मूळ अलिबागचा रहिवासी असलेला कु. अर्जुन विशाखा निखिल पाटील याने सायन्स ऑलिंपिक फाउंडेशन आयोजित इंटरनॅशनल राष्ट्रीय गणित ऑलिंपिड 2025-26 या परीक्षेत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
SOF च्या वतीने ही परीक्षा जगभरातील 72 देशांतील 4500 पेक्षा जास्त शहरांमधील 99,499 शाळांमध्ये घेण्यात आली होती. यामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. एवढ्या मोठ्या स्पर्धेत अर्जुनने प्रथम येऊन घवघवीत यश मिळवले आहे. त्याचा रोल नंबर MH 5074_04_H-113 असा आहे.
या नेत्रदीपक यशाबद्दल अर्जुनला गौरवण्यासाठी SOF तर्फे दि. 24 मे 2026 रोजी डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, 15 जनपथ रोड, विंडसर प्लेस, मेरिडियन हॉटेलशेजारी, नवी दिल्ली येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
अर्जुन हा वामा, खांदा कॉलनी, पनवेल, नवी मुंबई येथील रहिवासी असून त्याचे आजोबा श्री. रवींद्र परशुराम पाटील, अलिबाग, रायगड हे आहेत. अर्जुनच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालक निखिल पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.