संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान तर 24 जुलैला सोहळा पंढरपूरमध्ये
xtreme2day
14-05-2026 22:22:40
138542793
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2026चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; 8 जुलै रोजी आळंदीतून प्रस्थान तर 24 जुलैला सोहळा पंढरपूरमध्ये
श्रीक्षेत्र देवाची आळंदी (विशेष प्रतिनिधी) - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान 8 जुलै रोजी आळंदीतून होणार आहे. 33 दिवसांच्या या पवित्र प्रवासानंतर हा सोहळा 8 ऑगस्ट रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे. आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि दिंडी समाज संघटन यांची बुधवार (13) मे रोजी झालेली बैठक पार पडली, ज्यामध्ये या वर्षाच्या पालखी सोहळ्याचे सविस्तर वेळापत्रक निश्चित करण्यात आले.
आषाढी वारीसाठी पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप आणि प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या सोहळ्यात परंपरेप्रमाणे तीन उभी रिंगणे आणि चार गोल रिंगणे होणार आहेत. तसेच पुणे आणि सासवडमध्ये सोहळ्याचा प्रत्येकी दोन दिवसांचा मुक्काम असेल. 8 जुलै रोजी देऊळवाड्यातून माऊलींच्या पालखीचे जल्लोषात प्रस्थान होईल. प्रस्थानाचा पहिला मुक्काम आळंदीतील नवीन दर्शन मंडपात असेल. त्यानंतर 9 जुलै आणि 10 जुलै रोजी पालखी पुण्यात मुक्कामी असेल. सासवडमध्ये 11 जुलै आणि 12 जुलै रोजी मुक्काम करून सोहळा 13 जुलै रोजी जेजुरीला पोहोचेल. 14 जुलै रोजी पालखीचा मुक्काम वाल्हे येथे असेल. 15 जुलै रोजी माऊलींच्या पादुकांना निरा स्नान घालण्यात येणार असून त्याच दिवशी पालखी लोणंद येथे मुक्कामी असेल. पालखी सोहळ्यातील रिंगणे हे वारकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र असतात. त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
16 जुलै: दुपारी चांदोबाचा लिंब येथे पहिले उभे रिंगण होईल आणि त्यानंतर सोहळा तरडगाव मुक्कामी जाईल 17 जुलै: फलटण मुक्काम18 जुलै: बरड मुक्काम19 जुलै: नातेपुते मुक्काम 20 जुलै: पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होईल आणि सोहळा माळशिरस मुक्कामी जाईल 21 जुलै: सकाळी खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होईल. संध्याकाळी धावाबावी माउंट येथे मानाच्या भारुडानंतर सोहळा वेळापूर मुक्कामी जाईल.22 जुलै: ठाकूरबुवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होईल. याच दिवशी दसूरफाटा येथे संत सोपानदेव आणि माऊलींची बंधूभेट होईल, त्यानंतर सोहळा भंडीशेगाव मुक्कामी जाईल.23 जुलै: वाखरी येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथे गोल रिंगण पार पडेल.24 जुलै: इसबावी येथे तिसरे उभे रिंगण होईल आणि पादुकांजवळ आरती झाल्यानंतर सोहळा पंढरपूरमध्ये प्रवेश करेल.
पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भवानी पेठेतच माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करण्याच येणार आहे. शिवाय परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं आहे. तशी प्रक्रिया ही सुरु झाली आहे, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे. आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळयाचे नियोजनावर विचारविनिमय करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक देवस्थानने जाहीर केलं आहे. यात पुण्यातील मुक्कामावर शिक्कामोर्तब करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. भवानी पेठेतच माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. विठोबा मंदिरालगतची जागा खरेदी करण्याच येणार आहे. शिवाय परिसरातील अतिक्रमण हटवून या ठिकाणी निर्माण होणाऱ्या गर्दीचा प्रश्न मार्गी लावला जाणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसं आश्वासन दिलं आहे. तशी प्रक्रिया ही सुरु झाली आहे, असा दावा आळंदी देवस्थानचे विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप यांनी केला आहे.
या वर्षीचा श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळा 8 जुलै 2026 ते 9 ऑगस्ट 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होईल. त्यानंतर पालखीचा मुक्काम आळंदीमध्ये राहील. 9 जुलै रोजी पालखी सोहळा आळंदीहुन पुण्याकडे मार्गस्थ होईल. 9 व 10 जुलै असे दोन दिवस पालखी सोहळा पुणे येथे मुक्कामी राहील. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढीवारी आळंदी पंढरपूर पालखी सोहळयाचे नियोजनावर विचारविनिमय करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, पंढरपूर येथे विश्वस्त, दिंडी समाज, मानकरी, सेवेकरी आणि दिंडी प्रमुख यांची संयुक्त बैठक होत असते. या बैठकीत पुणे येथील मुक्कामाची जागा अपुरी पडत असल्याने पालखी सोहळ्याचे पुण्यातील मुक्कामासाठी अन्य पर्यायी जागांचा विचार करावा अशी सहमती झाली. त्यानुसार श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढवारी पालखी सोहळ्याचा पुणे येथील मुक्काम श्री पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ येथे होत असतो. दिवसेंदिवस पालखी सोहळ्यातील सहभागी वारकऱ्यांची संख्या वाढत असल्याने तसेच भवानीपेठ येथील अपुरी जागा याचा विचार करून 2010 पासून पुण्यातील मुक्कामाचे ठिकाण बदलण्याची मागणी समाजाकडून होत होती. त्या वेळी पालखी सोहळ्याचा पुण्यातील मुक्काम रेसकोर्स मैदानावर हलवावा अशी सूचना समाजातून आली होती. आता प्रशासनाने याबाबतीत दखल घेऊन मूळ जागेवरच पालखी मुक्काम ठेवण्यात येणार असे जाहीर केले आहे त्यामुळे हा प्रश्न निकालात निघाला आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.