Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राज्यातील 12 जिल्ह्यांत प्रशासनाकडून तीव्र उष्णतेचा हाय अलर्ट जारी; मुसळधार पावसाचाही इशारा, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक

xtreme2day   13-05-2026 20:53:25   95135830

राज्यातील 12 जिल्ह्यांत प्रशासनाकडून तीव्र उष्णतेचा हाय अलर्ट जारी; मुसळधार पावसाचाही इशारा, दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघणे धोकादायक

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात आज पुन्हा भारतीय हवामान विभागाने उष्णतेचा अलर्ट जारी केला. भारतीय हवामान विभागाने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला. परभणी, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, बुलढाणा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज जळगाव, परभणी, नंदूरबार, बीड, जालना, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, पुणे, धुळे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांनी शक्यतो दुपारी 12 ते 4 घरातून बाहेर निघणे टाळावे. उष्णतेचा अलर्ट जारी केला. प्रशासनाकडून नागरिकांना काही सूचना देखील देण्यात आल्या आहेत. तसेच कोकणात आज दमट आणि उष्णतेचा इशारा देण्यात आला. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने जारी केला.

 

 यंदा मे महिन्यात उष्णता अधिक वाढल्याचे अनुभवायला मिळत आहे. मात्र, अचानक अवकाळी पाऊसही होताना दिसत आहे. मुंबईमध्येही उष्णता वाढण्याचे संकेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. मे महिन्यात तापमानाने उच्चांक गाठला. पुढील काही दिवसात उष्णतेची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेकडून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्यात आली. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असल्याने तापमानाचा पारा देखील आता 42 अंश पार गेला. छत्रपती संभाजीनगर शहरात प्रमुख रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाली. काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा उच्चांकी तापमानाची नोंद झाली असून 43.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.

 

दरम्यान पुढील दोन दिवसासाठी छत्रपती संभाजीनगर आणि जालना या ठिकाणी हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला. जळगाव जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. जळगावच्या तापमानात गेल्या दोन दिवसात मोठी वाढ झाली. उष्णतेच्या झळा आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक हैराण आहेत. शीतपेयांच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली. 24 तासात जळगावच्या तापमानात तब्बल 2 अंशांनी वाढ. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं जिल्हा प्रशासनाच आवाहनही केल आहे. 

 

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पुढील काही दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर  अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  अकोला जिल्ह्यात सोमवारी 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.  विदर्भातील इतरही जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात मे महिन्यात तापमान 44 ते 46 अंशांपर्यंत नोंद होणं हे सामान्य आहे.  राजस्थान, गुजरातच्या क्षेत्रात प्रति चक्रावत स्थितीमुळे विदर्भात कोरडी व उष्ण हवा वाहत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे, असं प्रवीण कुमार यांनी म्हटलं आहे.महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा कहर पहायला मिळत आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगावात तापमान 44 अंशांवर पोहोचलं आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. उष्णतेच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये यावेळी हे तापमान चार अंशाने वाढलं आहे. नाशिक शहरात दोन वर्षानंतर पहिल्यांदाच कमाल तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला आहे. नाशिक शहरातील तापमान 40 शी पार गेले असून, आज शहरात तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. नाशिकमध्ये या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तीव्र उन्हाच्या झळा आणि रात्री होणाऱ्या असाह्य उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाचा पारा तब्बल 45 अंशांच्या आसपास पोहोचत आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती