xtreme2day 09-05-2026 21:01:19 176325993
तामिळनाडूमध्ये विजय यांच्या TVK ला सरकार स्थापण्यासाठी 120 चे बहुमत; VCK आणि IUML कडून ‘बिनशर्त पाठिंबा’ बंगळूरू (विशेष प्रतिनिधी) - तामिळनाडूमध्ये अभिनेता - राजकारणी विजय यांच्या Tamilaga Vettri Kazhagam (TVK) पक्षाने बहुमताचा आकडा पार केल्यानंतर Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK) आणि Indian Union Muslim League (IUML) यांनी TVK ला सरकार स्थापन करण्यासाठी “बिनशर्त पाठिंबा” जाहीर केला आहे. त्यामुळे आज मी तिला टीव्हीके पक्षाकडे 120 आमदारांचे संख्याबळ झाले आहे. या घडामोडीनंतर तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल पाहायला मिळत असून, विजय यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग अधिक मोकळा झाला आहे. VCK आणि IUML या दोन्ही पक्षांनी राज्याच्या विकासासाठी आणि स्थिर सरकारसाठी TVK सोबत सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. तमिळनाडूच्या राजकारणात एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडलीय. सुपरस्टार विजय यांच्या सत्तेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना मोठी कसरत करावी लागत होती, मात्र आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विदुथलाई चिरुथाईगल कात्ची म्हणजेच व्हीसीके (VCK) या पक्षाने विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम या पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने बहुमताचा आकडा यशस्वीपणे गाठला असून, आता तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेचा आणि शपथविधीचा मार्ग मोकळा झाला आहे. TVK च्या विजयामुळे राज्यातील पारंपरिक राजकीय समीकरणांनाही मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. विजय यांच्या राजकीय पदार्पणानंतर प्रथमच त्यांच्या पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन मिळवत सत्ता स्थापनेकडे वाटचाल केली आहे. Adhav Arjuna यांनी TVK च्या “विजयाची” घोषणा करत सरकार स्थापनेसाठी Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK) ने दिलेल्या पाठिंब्याचे पत्र सार्वजनिकरित्या दाखवले, असे PTI ने वृत्त दिले आहे.दरम्यान, सूत्रांनी NDTV ला सांगितले की हा पाठिंबा “बिनशर्त” असून, त्यामुळे तामिळनाडूमध्ये अनेक दशकांनंतर पहिले आघाडी सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. Vijay यांच्या नेतृत्वाखालील Tamilaga Vettri Kazhagam (TVK) आता सत्ता स्थापनेच्या अधिक जवळ पोहोचली आहे. तामिळनाडूमधील सरकार स्थापनेचा पेचप्रसंग शनिवारी संपुष्टात येताना दिसला, कारण Viduthalai Chiruthaigal Katchi (VCK) ने Vijay यांच्या नेतृत्वाखालील Tamilaga Vettri Kazhagam (TVK) ला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे आघाडीने 234 सदस्यांच्या विधानसभाेत बहुमतासाठी आवश्यक असलेला महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
jg52rf