xtreme2day 13-04-2026 21:04:09 12735992
पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 पार जाण्याची शक्यता; हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुणे हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा जारी केला. पुढील 5 दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात उन्हाचा पारा 42 – 45 पार जाण्याची शक्यता आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. पुढील पाच दिवस धोक्याची असणार आहेत. अकोला जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा अकोला जिल्ह्याचा पारा आज 43 वर तर पुढील दोन दिवसात 45 अंशावर जाण्याची शक्यता आहे. अमरावती – 42 पुढील दोन दिवसात 45 जाण्याची शक्यता.विदर्भासह मध्यमहाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 पार. नागरिकांनी पुढील 5 दिवस विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. दोन दिवसांनंतर विदर्भातील जिल्ह्याना उन्हाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. तळकोकणामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. आठ दिवसापासून नागरिक अति उष्णतेने हैराण देखील झाले होते. जवळपास 36 °ते 38 ° अंश इतका पारा वाढलेला पाहायला मिळाला होता. त्यामुळे कमालीचं तापमानामध्ये वाढ देखील झाले होती. त्याचाच परिणाम म्हणून आज सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्यामुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. जर अवकाळी पाऊस झाला तर असलेलं आंबा आणि काजू पिकावर मोठा परिणाम होऊ शकतो. अवकाळीनंतर पुन्हा उन्हाचा तडाखा; मालेगावचा पारा 41.04 वर, उकाड्याने नागरिक हैराण. अवकाळी पावसाने काही दिवसांपूर्वी मालेगावात हजेरी लावल्यानंतर उकाड्यापासून दिलासा मिळेल अशी अपेक्षा नागरिकांना होते. मात्र पावसानंतर पुन्हा उन्हाचा तडाखा वाढला असून मालेगावचा पारा तब्बल 41.04 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. नांदेड जिल्ह्यात जून काही सूर्य आग ओकत असून तापमान चाळीशी पार पोहोचलय. या वाढत्या उष्णतेचा फटका केळी बागांनाही बसत असून केळीच्या बागा करपून जात आहेत. अर्धापुर, मुदखेड नांदेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. शिवाय पाण्याची पातळी देखील खालावली जात असल्याने केळीला पाणी कमी पडत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेमुळे जनजीवनावर परिणाम जाणवू लागला असून गजबजलेल्या रस्त्यांवरही ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या तीव्र तापमानाचा फटका नव्याने लागवड केलेल्या फळबागांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू करत आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
28cjen
qrgqee
hxq7ea