Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राज्य सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू नये, यासाठी पीएनजीच्या कनेक्शनबाबत घेतला मोठा निर्णय

xtreme2day   01-04-2026 20:25:49   51236645

राज्य सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू नये, यासाठी पीएनजीच्या कनेक्शनबाबत घेतला मोठा निर्णय

 

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्य सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू नये यासाठी पीएनजीच्या कनेक्शनबाबत मोठा निर्णय घेतला. या एका निर्णयामुळे लोकांची गॅस टंचाईची समस्या संपण्यास मदत होणार आहे. 

 

 

जागतिक घडामोडींमुळे एलपीजी (LPG) पुरवठ्यावर मर्यादा आल्याने महाराष्ट्र सरकारने ‘सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन’ (CGD) नेटवर्कचा विस्तार युद्धपातळीवर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार, पाइपलाईनसाठीच्या प्रलंबित परवानग्या आता ‘मंजूर’ समजल्या जातील आणि नवीन अर्जांना २४ तासांत मंजुरी दिली जाईल. कामाला गती देण्यासाठी रस्ते पूर्ववत करण्याचे शुल्क माफ करण्यात आले असून कंपन्यांना २४ तास काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. 

 

 

आता अग्निशमन दल किंवा वाहतूक पोलिसांच्या ना-हरकत प्रमाणपत्राची (NOC) गरज भासणार नाही. सर्व अटी, शर्ती शिथील करण्यात आल्या आहेत. आतापासून PNG (piped natural gas) ला पाणी, वीज प्रमाणे अत्यावश्यक सेवा मानली जाईल. हॉटेल, शाळा, हॉस्पटिल्स, कम्युनिटी किचन, वसतिगृह यांना कमर्शियल दराने 50 टक्के सप्लाय केले जाईल. मात्र डोमेस्टिक वापरला प्राधान्य असेल, असे सरकारने सांगितले आहे. या या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी नागरी पुरवठा संचालकांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, कुठेही इंधन टंचाई नाही. युद्धामुळे लोकांमध्ये अस्थिरता वाढलेली आहे. त्यामुळे लोक घाईत गॅस बुकिंग करत आहेत, असे केंद्र सरकारने सांगितलेले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती