Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

देशात GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर - मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

xtreme2day   11-03-2026 22:55:28   16385305

देशात GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर - मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती

 

मुंबई (विधानसभा प्रतिनिधी) -  देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा वाटा सुमारे साडे नऊ टक्के असला तरी देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा १४.३ टक्के आहे. त्यामुळे देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत नमूद केले. 

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, परकीय थेट गुंतवणुकीत (FDI) देखील महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच तेल वगळता इतर वस्तूंच्या निर्यातीतही महाराष्ट्र अव्वल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय देशातील सॉफ्टवेअर निर्मितीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून स्टार्टअप्सच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक प्रगती देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती