Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहराच बदलणार, फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, एमएमआर रिजनमध्ये 10 जल मेट्रो

xtreme2day   14-02-2026 20:46:41   7372982

मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहराच बदलणार, फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, एमएमआर रिजनमध्ये 10 जल मेट्रो

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून 10 व्या जलमार्गांचा प्रस्ताव आहे. यात मुंबई, मिरा-भाईंदर, वसई-विरार, कल्याण, ठाणे या ठिकाणी 10 जलमार्गांची सुविधा होणार असल्याच या प्रस्तावात आहे. नवीन 10 जलमार्ग वाहतूक सेवेत दाखल झाल्यास 85 किमीचा जलमार्ग एकूण 200 किमीपर्यंत पोचेल, शिवाय या 10 जलमार्गांमुळे मुंबईच्या प्रवासी वाहतुकीचा चेहरामोहराच बदलणार, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी दूर करण्याच्या उद्देशाने अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेकविध रस्ते प्रकल्प राबवले जात आहेत. त्याच अनुषंगाने आता जलवाहतुकीलाही चालना देण्यात येणार असून महाराष्ट्र सागरी मंडळाकडून एमएमआरमध्ये नवीन 10 मार्गांवर जल मेट्रोच्या सविस्तर आराखड्याचे काम हाती घेण्यात आले. दरम्यान, हे काम अंतिम टप्प्यात असून मंडळाला लवकरच सल्लागार कंपनीकडून आराखडा सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.

 

 

सागरी मंडळाकडून सध्या एकूण 85 किमी अंतर व्यापणाऱ्या 21 मार्गांवर जल वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. एमएमआरला मोठा समुद्र लाभल्याने येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सागरी मंडळाने वाहतुकीचे अतिजलद पर्याय देणारे आणखी नवीन 10 जलमार्ग विकसित केले आहेत. दरम्यान, ऑगस्ट 2025 मधील अहवालात 21 ठिकाणाची निवड करण्यात आली होती. त्यात आता 10 नव्या जलमार्गांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई, मिरा, भाईंदर, परिसरात जल वाहतूकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सध्या 21 ठिकाणी जल वाहतूक मार्ग, 85 किमीचे मार्ग, 10 नावे मार्ग सुरु झाल्यास 200 किमीची जलवाहतूक प्रस्तावित आहे. रस्ते, रेल्वे वाहतूकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतूकीचा पर्याय आहे.तर सागरमाला 2.0 अंतर्गत 60% केंद्र, 40 टक्के राज्य सरकारच्या निधीतून प्रकल्प रबावणार असल्याची माहिती आहे.

 

आम्ही जलमेट्रो विषय मांडला होता आणि राज्य सरकारने त्यावर काम सुरू केलं आहे. मुंबईला जल मेट्रोची आवश्यकता आहे. शिवाय या जलमार्गांचा व्यवहार्यता तपासणी अहवाल यापूर्वीच पूर्ण करण्यात आला आहे. त्यानंतर या नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी मेसर्स कोची मेट्रो लिमिटेड या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या आराखड्याचे काम अंतिम टप्यात असल्याची लेखी माहिती सागरी मंडळाने शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना दिली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती