Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

राज्यातील जेष्ठ नागरिकांना महिना 7000 रु.मानधन -डॉ.जयपाल पाटील

xtreme2day   22-11-2025 19:17:12   8904777

राज्यातील जेष्ठ नागरिकांना महिना 7000 रु.मानधन -डॉ.जयपाल पाटील 

 

अलिबाग (विशेष प्रतिनिधी) -महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांची संख्या वाढत असून त्याच्या साठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना बाबत दिनांक 15जुलै 2025 रोजी विधेयक मंजूरीचे राजपत्र प्रसिद्ध केले आहे.याबद्दल महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक संघटना,समाज सेवक पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस  यांचे अभिनंदन करीत आहेत. या योजना मिळविण्यासाठी वयाची 65 वर्ष पुर्ण झाली असतील त्याचे  भारत सरकारचे अथवा महाराष्ट्र शासनाचे जेष्ठ नागरिक ओळखपत्र शासनाच्या ईसेवा केंद्रात काढावे असे मार्गदर्शन अलिबाग जेष्ठ नागरिक संघटनेच्या मासिक बैठकीत जेष्ठ पत्रकार प्रा.डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले. यावेळेस अध्यक्ष श्री.प्रफुल्ल  राऊत व उपाध्यक्षा सौ.चारुशिला कोरडे व्यासपीठावर उपस्थित होते.

 

 प्रा.डॉ.जयपाल पाटील म्हणाले की, ज्या जेष्ठ नागरिकास कोणतीही पेन्शन मिळत नाही, त्याना आता दरमहा रु.7000/-मिळणार असुन,महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, मंदिरे पाहण्यास वर्षाला रु.15000/-अनुदान मिळणार असून, निराधार जेष्ठाना राहण्याची व जेवणाची सोय मोफत महाराष्ट्र शासन करणार आहे. केंद्र सरकारने 70वर्षावरील जेष्ठांना रेल्वे प्रवास 50 टक्के सवलत तर महाराष्ट्र राज्य परिवहन कडून  एस.टी.प्रवास 50 टक्के सवलत त्याच बरोबर मालमत्ता करात 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे.आरोग्य समस्या साठी सरकारी रुग्णालयात मोफत उपचार आहेतच, सोबत खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया साठी रु.5लाख मिळणार आहेत. यासाठी प्रत्येक  जेष्ठ नागरिकांनी केंद्र अथवा महाराष्ट्र शासनाचे  ओळखपत्र  काढणे आवश्यक आहे, यामधे सरकारकडून 3 विभागात कार्डाची आखणी केली असुन वय वर्ष 80 वर सुपर कार्ड,वय 70 च्या वर मध्यम कार्ड आणी 65वर्षावरील  सर्व योजना प्राप्त होणार असे डॉ.जयपाल पाटील यांनी सांगितले.व कोणतीही आपत्ती आल्यावर रायगडचा युवक फाउंडेशनला संपर्क साधून सेवा करण्याची संधी द्यावी असे सांगितले.

 

यावेळेस संघटनेचे  सचिव श्री.नंदु तळकर ,सहसचिव श्रीमती मेघना कुलकर्णी,खजिनदार प्रणिता वर्तक, श्री.आर.के.घरत,कार्यकारिणी सदस्य व ईतर सभासद उपस्थित होते.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती