Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान; तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल

xtreme2day   04-11-2025 21:35:31   298423877

येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान; तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल

 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात निवडणुकीसाठी पात्र असलेल्या 246  नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये 246  नगर परिषदेमध्ये दहा नव्या नगर परिषदांचा समावेश आहे तर  42 नगर पंचायतींमध्ये 15 नव्या नगर पंचायतींचा समावेश आहे. एकूण  6 हजार 859  सदस्य आणि 288 अध्यक्षांची निवड होणार आहे.

 

अखेर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे, मंगळवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंर्भात महत्त्वाच्या तारखांची घोषणा केली आहे. येत्या दोन डिसेंबर रोजी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

 

दरम्यान, आता राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी निवडणुकीची घोषणा केल्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती