समाजात शांती निर्माण करण्याचे कार्य पत्रकार करतात - राज्यपाल हरिभाऊ बागडे
xtreme2day
27-09-2025 22:36:25
7347296
समाजात शांती निर्माण करण्याचे कार्य पत्रकार करतात - राज्यपाल हरिभाऊ बागडे

मांउट अबु (डॉ.जयपाल पाटील ब्युरोचीफ याजकडून) - भारतीय लोकात लोकतंत्र आहे.आपल्या देशात पाटलीपुत्र मधे पहिली नगर पंचायत होती,आपला इतिहास सांगतो.तेथे जनतेच्या आरोग्यासाठी स्वछता,आरोग्य कमिटया होत्या. सध्या देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.त्याचा प्रचार पत्रकारानी करणे गरजेचे आहे.आपली संस्कृती हजारो सालापासून महत्वाची असुन नैतिकता आणी मदत करण्याची शक्ती प्रत्त्येक भारतीयात आहे.आणी संपुर्ण जगात आपला देश प्रगतीपथावर असुन यासाठी भारतातील पत्रकारांचा सहभाग महत्वपूर्ण आहे.राष्ट्रीय पत्रकार संमेलनात ऊदघाटन मार्गदर्शनात राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सांगितले.
यावेळेस व्यासपीठावर राज्यपाल हरिभाऊ बागडे ऊदघाटक ब्रह्माकुमारी प्रमुख मोहिनी दीदी कार्य क्रम अध्यक्ष, सन्माननीय पाहुणे श्रीमती चौधरी,जिलाधिकारी सिरोही,करुणा भाई,उपाध्यक्ष, सचिव ब्रम्हा कुमारी, प्रा.संजय त्रिवेदी, प्रो.मानसिंग परमार, श्री.अजित पाठक,डॉ.मोहिनी शात्री, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळेस राज्यपाल म्हणाले प्रजापिता ब्रम्हा कुमारी ईश्वरीय विद्यालयातर्फे समाजासाठी,नशाबंदी,अंधश्रद्धा व पर्यावरण च्या प्रदर्शनी, चे महत्वपूर्ण कार्य जगभर करीत असून महिला साठी विशेष सेवा केली जाते.आणि असे महिलांचे जगात एकमेव संघटन आहे.त्याच्या सेवा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य पत्रकारांनी करावे असे सांगितले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात मोहिनी दिदी म्हणाल्या मी वयाच्या 11वर्षा पासुन प्रवेश केला आणी शिवबाबांनी मला पत्रकार व वकील होण्याचा सल्ला दिला. प्रत्त्येक पत्रकारामधे शांती,प्रेम भावना निर्माण होण्यासाठी पत्रकार राष्ट्रीय संमेलन घेऊन देशसेवेत सामावून घेऊया ज्या मुळे जगात शांती निर्माण होईल.मी अनेक वर्ष अमेरिकेत सेवेत होते असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीके शांतनु जनसंपर्क अधिकारी यांनी केले,तर सूत्रसंचालन बीके चंद्रकला दीदी यांनी केले. या राष्ट्रीय संमेलनात देशभरातून 1500 पत्रकार ऊपस्थित आहेत.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.