गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात सर्वच ठिकाणी भाविकांचा वाजतगाजत बाप्पाला निरोप, मुंबईत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी
xtreme2day
07-09-2025 22:03:14
170564076
गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या! राज्यात सर्वच ठिकाणी भाविकांचा वाजतगाजत बाप्पाला निरोप, मुंबईत लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात सर्वच ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत भाविकांनी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला. मुंबई -पुणे तसेच इतर शहरातील गणपती विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी तसेच बाप्पाला निरोप देण्यासाठी लोकांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसानेही हजेरी लावली.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गिरगाव चौपाटी येथे आयोजित विसर्जन सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करून गणरायांना निरोप दिला. मुंबई शहरामध्ये गणेश विसर्जनासाठी 21 हजारांहून अधिक पोलीस अधिकारी-जवान तैनात होते. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, गणेश गल्ली मुंबईचा राजा, काळाचौकीचा महागणपती यासह लालबाग परिसरातील प्रसिद्ध गणपतींची मिरवणूक वैशिष्टयपूर्ण ठरली.
महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला दिलेल्या राज्य महोत्सवाच्या दर्ज्यानुसार, या वर्षीचा उत्सव मुंबईत अभूतपूर्व जल्लोषात पार पडला. पुण्यातही मानाच्या गणपतींचे विसर्जन जल्लोषात पार पडले. मुंबई, पुणे आणि राज्यातील सर्व शहरांमध्ये तसेच गावांमध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुका शिस्तीत आणि शांततेत पार पडल्या असे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी फडणवीस सांगितले. तसेच लोकांनी मोठ्या जल्लोषात उत्सव साजरा केला. विसर्जनावेळी मनात थोडी खंत आणि दु:ख असते, पण त्याचवेळी बाप्पा पुढील वर्षी पुन्हा येणार या आनंदाने प्रत्येकाचे मन भरून जाते असेही ते म्हणाले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.