भारताच्या संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद ; सरन्यायाधीश भुषण गवई यांचे प्रतिपादन
xtreme2day
08-07-2025 18:21:21
18976185
भारताच्या संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद ; सरन्यायाधीश भुषण गवई यांचे प्रतिपादन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - भारतीय राज्यघटना शालेय जीवनापासूनच माझ्या मनात रुजली आहे. संविधानात रक्तहीन क्रांतीची ताकद, असल्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं. तसेच, माझे वडील आणि या सभागृहाच नात वेगळं आहे, असे म्हणत त्यांच्या वडिलांनी 30 वर्षे सभागृहात गाजवल्याची आठवण देखील गवई यांनी यावेळी सांगितली.
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज राज्याच्या विधिमंडळ सभागृहात सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे भूमीपुत्र आज देशाचे सरन्यायाधीश बनले असल्याची बाब महाराष्ट्राचा गौरव आणि अभिमान वाढवणारी आहे, त्यामुळे राज्याच्या 13 कोटी जनतेच्यावतीने सभागृहात विधानसभा अध्यक्ष, उपसभापति, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि आमदारांच्या उपस्थितीत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच सरन्यायाधीश यांनी पहिल्या बाकावर उपस्थित सर्व मान्यवरांना अभिवादन केलं. माझा हा शेवटचा सत्कार समारंभ आहे, महाराष्ट्राच्या सर्व जनतेकडून हा सत्कार आहे असेही ते म्हणाले.
मी नेहमीच स्वतःला भारतीय राज्य घटनेचा विद्यार्थी समजत आलो आहे, मी 10 वी मध्ये असताना माझ्यात राज्यघटना रुजली. विधी मंडळात माझ्या वडिलांचे 30 वर्षापेक्षा जास्त वर्षे प्रेमाचे नाते राहिले आहे, त्या विधी मंडळात माझा सत्कार हा न भुतो न भविष्यती असा क्षण आहे, असे म्हणत या सत्कार सोहळ्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते, ते म्हणायचे की मी पहिला आणि शेवटचा भारतीय आहे. जेव्हा केव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा देशासाठी आपण एकत्र आले पाहिजे. बाबासाहेबांना 1947 मध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष करण्यात आले, एक वर्षानंतर त्यांनी राज्यघटनेचा पहिला ड्राफ्ट सादर केला, बाबासाहेब म्हणाले माझ्या मते एकच घटना संपूर्ण देशासाठी चांगली आहे. आपला देश एकसंघ ठेवायचा असेल तर वन नेशन वन सिटीझन हे ठेवायला पाहिजे. फेड्रलिजम जर आपण आणतोय तर ते फ्लेक्सिबल असले पाहिजे, म्हणून जेव्हा केव्हा हा देश एकसंघ कसा राहील यासाठी घटनेत प्रॉव्हीजन केले आहे, अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली. भारतीय राज्य घटनेचे तीन स्तंभ आहेत, विधिपालिका न्याय पालिका आणि कायदेपालिका. राज्यघटनेनुसार कायदायचे पालन करण्याची जबाबदारी विधीपालिकेची आहे, न्याय व्यवस्था स्वतंत्र असावी दबाव तंत्रात नसावी ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर यांची होती. स्वातंत्र्य टिकवायचे असेल तर जातीभेद बाजूला ठेवून काम कराव लागेल, बाबासाहेब आंबेडकर यांचे ही मत असेच होते. 75 वर्षांचा कालखंड हा संविधानासाठी मोठा नाही, सामाजिक न्याय व्यवस्थेत न्याय देणारं संविधान आहे. दोन महिला राष्ट्रपती झाल्या, दोन वेगवेगळ्या दलातील समुदायाच्या राष्ट्रपती झाल्याची आठवणही गवई यांनी सांगितली.
डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक असलेल्या देशात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदावर काम करायला मिळत आहे. एका संवैधानिक पदावर काम करणे म्हणजे घटनेवर काम करणे अभिप्रेत असते. कारण, रक्तहीन क्रांती करण्याची ताकद संविधानात आहे. संविधानात काम करणे ही तारेवरची कसरत असते , पण आपणास त्या आधारावरच काम कराव लागतं. नागपूर येथील झोपडपट्टी संदर्भात वकील म्हणून लढत होतो. देवेंद्रजी नागपूरचे स्थानिक आमदार होते. 22 वर्षांच्या कार्यकाळात बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आज माझा बहुमान केला, महाराष्ट्राच्या जनतेला वंदन करतो, असे म्हणत सरन्यायाधीशांनी राज्यघटनेचं महत्त्व आणि ताकद समजावून सांगितली.
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा होणारा सत्कार हा संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे, रासू गवई यांचा सामाजिक बांधिलकीचा वसा आपण पुढे चालवला आहे. कलम 370 चा निर्णय आपण कायम ठेवला. राज्यघटना स्वीकारल्याचा अमृतमहोत्सवी वर्षे आणि महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश होतात हा एक योगायोग आहे, असे म्हणत विधानसभा सभापती राम शिंदे यांनी भूषण गवई यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. तर सरन्यायाधीशांचा आजचा हा सत्कार फक्त विधीमंडळाचा नाही तर 13 कोटी जनतेकडून आहे, त्यांना सत्कार संदर्भात विचारणा केली तर ते फक्त सत्कार नको म्हणाले, आपण संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा असे बोलले, हा त्यांचा साधेपणा आहे. दादासाहेब गवई हे अजातशत्रू होते, त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला, ते सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला, तेव्हा गवई साहेब सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात असताना अनेकदा कायदा आणि व्यापक जनहित असताना ही त्यांनी मार्ग काढल्याचेही त्यांनी म्हटले.
राज्यातील वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती. मात्र, गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला. लॅंडमार्क जजमेंट त्यांनी दिल आणि त्याचा फायदा झाला. हायकोर्टात असतानाही ते वकिलांच्या बाजूने असायचे. आजही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना ३/४ मतदान होईल. एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत, कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात. दिक्षाभूमी उभी करण्याच काम दादासाहेबांनी केलं. सामान्य माणूस हा असामान्य कसा होतो याचे उदाहरण गवई साहेब आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे, आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय. भूषण गवई यांनी 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले. देशाला एक अस्सल हिरा मिळालाय, एवढ्या मोठा पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली. सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
प्राथमिक शाळेत मातृभाषेत शिक्षण घ्यावं की नाही, त्यावेळी पर्याय नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या गवई साहेबांचा प्रवास हा गल्लीतून हा दिल्लीपर्यंत सर्वोच्च पदावर झालेला आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी शाळेतील विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च स्थानावर असल्याचे सूचवले. महाराष्ट्राचा हा गौरव आहे, मी त्यांचा आदरयुक्त दबदबा पाहिला आहे. राज्याच्या राजकारण्यांमध्ये आणि प्रशासनात त्यांचा आदरयुक्त दबदबा राहिलेला आहे. सामाजिक जाण, संविधानावर निष्ठा आहे, कायद्यानुसार न्याय देणं हे दिसत आलं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं. तसेच सरन्यायाधीशांच्या सत्कार सोहळ्या बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, इथं दोन्ही सभागृहाचे गटनेते असे म्हटले पण दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते म्हणून मी एकटाच आहे. काल महाराष्ट्रावर कोणी तरी बोलले, मात्र त्यांना उत्तर कृतीतून देण्याची आवश्यकता आहे. आताच आपण महाराष्ट्र गीत ऐकलं की, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. त्यामुळे गवईसाहेब हे तख्त राखत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पाईक आज सरन्यायाधीश म्हणून बसतो, हे खर आहे. प्राथमिक शिक्षण मराठीत घेतल्यानंतरही सरन्यायाधीश पदावर जाता येतं याचे उदाहरण म्हणजे सरन्यायाधीश आहेत, असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा होणारा सत्कार हा संपूर्ण महाराष्ट्राचा सन्मान आहे, रासू गवई यांचा सामाजिक बांधिलकीचा वसा आपण पुढे चालवला आहे. कलम 370 चा निर्णय आपण कायम ठेवला. राज्यघटना स्वीकारल्याचा अमृतमहोत्सवी वर्षे आणि महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश होतात हा एक योगायोग आहे, असे म्हणत विधानसभा सभापती राम शिंदे यांनी भूषण गवई यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.
सरन्यायाधीशांचा आजचा हा सत्कार फक्त विधीमंडळाचा नाही तर 13 कोटी जनतेकडून आहे, त्यांना सत्कार संदर्भात विचारणा केली तर ते फक्त सत्कार नको म्हणाले, आपण संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा असे बोलले, हा त्यांचा साधेपणा आहे. दादासाहेब गवई हे अजातशत्रू होते, त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला, ते सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला, तेव्हा गवई साहेब सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला, अशी आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली. तसेच, मुंबई उच्च न्यायालयात असताना अनेकदा कायदा आणि व्यापक जनहित असताना ही त्यांनी मार्ग काढल्याचेही त्यांनी म्हटले.
वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती. मात्र, गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला. लॅंडमार्क जजमेंट त्यांनी दिल आणि त्याचा फायदा झाला. हायकोर्टात असतानाही ते वकिलांच्या बाजूने असायचे. आजही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना ३/४ मतदान होईल. एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत, कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात. दिक्षाभूमी उभी करण्याच काम दादासाहेबांनी केलं. सामान्य माणूस हा असामान्य कसा होतो याचे उदाहरण गवई साहेब आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे, आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय. भूषण गवई यांनी 14 मे रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले. देशाला एक अस्सल हिरा मिळालाय, एवढ्या मोठा पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली. सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
प्राथमिक शाळेत मातृभाषेत शिक्षण घ्यावं की नाही, त्यावेळी पर्याय नव्हता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या गवई साहेबांचा प्रवास हा गल्लीतून हा दिल्लीपर्यंत सर्वोच्च पदावर झालेला आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठी शाळेतील विद्यार्थी देशाच्या सर्वोच्च स्थानावर असल्याचे सूचवले. महाराष्ट्राचा हा गौरव आहे, मी त्यांचा आदरयुक्त दबदबा पाहिला आहे. राज्याच्या राजकारण्यांमध्ये आणि प्रशासनात त्यांचा आदरयुक्त दबदबा राहिलेला आहे. सामाजिक जाण, संविधानावर निष्ठा आहे, कायद्यानुसार न्याय देणं हे दिसत आलं आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं.
दरम्यान, विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवड करण्यात यावा यासाठी विरोधी पक्षाच्यावतीने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे दाद मागण्यात आली. महाविकास आघाडीच्यावतीने जितेंद्र आव्हाड यांनी हे निवेदन सरन्यायाधीशांना दिले. दरम्यान, आज सकाळी सरन्यायाधीश विधिमंडळात येत असताना संविधानाची पायमल्ली केली जात असल्याची नाराजी सकाळी सभागृहात विरोधकांनी केली होती. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद जसे घटनात्मक आहे. त्याचप्रमाणे " विरोधी पक्ष नेता " हे पद देखील घटनात्मक पद आहे. केवळ अध्यक्ष विधानसभा यांचा अधिकार असल्यामुळे त्यावर निर्णय न घेणे ही देखील घटनेची पायमल्ली होत आहे. आपला देश हा संविधानाप्रमाणे काम करीत असतो. आपण देखील संविधानाचे पाईक आहात, त्यामुळे संविधानाची पायमल्ली न होणे हेही सर्वाचीच जबाबदारी आहे. आम्ही जाणतो की, विधीमंडळाच्या कामकाजामध्ये मा. न्यायालय हस्तक्षेप करीत नाही. तरी सुध्दा संविधानाचे पाईक म्हणून व लोकशाहीच्या चार स्तभांपैकी एका स्तंभाचे प्रमुख म्हणून ही बाब आपल्या निदर्शनास आणून इच्छितो, असे सरन्यायाधीशांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.