xtreme2day 13-05-2025 17:34:04 15685113
पूर्व मान्सूनला सुरुवात; महाराष्ट्रात यंदा मान्सून लवकर होणार दाखल पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी आज पूर्व मान्सून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 6 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. 27 मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल तसेच महाराष्ट्रात मान्सून 6 जूनच्या आसपास येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून 5 ते 6 दिवस आधी दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. तसेच मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास १०५ टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस होताना दिसतोय. तसेच येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मॉन्सून पहिल्या टप्प्यात सरासरीपेक्षा जास्त राहील, जवळपास 105 टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून यंदाच्या हंगामात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात सुद्धा जास्त पाऊस पडेल अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली. आज नैऋत्य मोसमी पावसाच्या आगमनाबाबत माहिती समोर आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये निकोबार बेटांवर अनेक ठिकाणी मध्यम तसेच काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती नोंदविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.