xtreme2day 21-03-2025 15:09:41 8844414
पुणे-नाशिक अंतर 2 तासांनी कमी होणार? सरकारचा महत्त्वाकांक्षी ग्रीन कॉरिडॉर प्रकल्प लवकरच सुरू होणार मुंबई (विधानसभा प्रतिनिधी) - पुणे-नाशिक या दोन शहरांमधील अंतर कमी होणार आहे. सरकारने पुणे-नाशिक हरित महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना जारी केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया ही दोन वर्षांपासून रखडलेली होती. अखेर सरकारने यासाठी मंजुरी दिली आहे. नाशिकमधील कृषी बाजारपेठा आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 134 किलोमीटर लांबीचा हरित महामार्ग पुणे आणि नाशिक या दोन शहरांमधील अंतर कमी करणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ दोन ते अडीच तासांनी कमी होणार आहे. नाशिकमधील कृषी बाजारपेठा आणि पुण्यातील औद्योगिक कंपन्यांना विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे. या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध होता. मात्र राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून योग्य तो तोडगा काढला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 1545 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी सुमारे 15 हजार 696 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे पुणे आणि नाशिकमधील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तसेच, औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे.