Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

ऐतिहासिक महाड मध्ये भीमसृष्टी उभारणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

xtreme2day   20-03-2025 19:14:36   7779029

ऐतिहासिक महाड मध्ये भीमसृष्टी उभारणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न

 

 महाड  ( डॉ. जयपाल पाटील यांजकडून ) -  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी महाडमध्ये उभारण्यात येईल, यासाठी लागणारा सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली.

महाड येथे समाजाला समानतेचा व समतेचा संदेश देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाचा 98 व्या वर्धापन दिना निमित्ताने सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट व रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी  सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड,समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव,  डॉ.भदंत राहुल बोधी,   यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

राज्य शासनाच्या वतीने यावेळी हेलिकॉप्टर मधून चवदार तळे परिसरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.  

चवदार तळे सुशोभिकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेल्या 7 कोटी रुपयांच्या तसेच राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या तीन कोटी रुपयांची कामे तातडीने सुरू केली जातील, असेही श्री.शिरसाठ यांनी सांगितले. चवदार तळे येथील पाण्याच्या शुद्धीकरणासाठी फिल्टरेशन प्लांट लावण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी  चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापन दिनासंदर्भात शासन तातडीने मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल असे सांगितले. 

चवदार तळे सत्याग्रहाच्या 98 व्या वर्धापन दिनाला संपूर्ण देशभरातून लाखो  अनुयायी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. येणाऱ्या सर्व भीम अनुयायांना सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
xlPfRwrniYnn 22-03-2025 14:33:58

xtreme2day.com
gnrHsoArlHO 23-03-2025 20:36:22

xtreme2day.com
GuitVoWrp 24-03-2025 13:51:09

xtreme2day.com
LRZwfejZNILrBL 25-03-2025 18:31:17

xtreme2day.com
KIASbEcKOlzAH 26-03-2025 16:04:59

xtreme2day.com
chIqYCDeeAFq 26-03-2025 23:00:31

xtreme2day.com
BWGjOqixlzh 27-03-2025 22:48:25

xtreme2day.com
PiuWyYkTo 29-03-2025 03:16:35

xtreme2day.com
DIMFeRzZCjBPsRp 30-03-2025 10:03:50

xtreme2day.com
xTDwKYaU 30-03-2025 17:27:03

xtreme2day.com
eWlmgUYVhSQngp 04-04-2025 01:03:33

xtreme2day.com
NvohbbtqQ 07-04-2025 08:50:11

xtreme2day.com
OsXmhldh 07-04-2025 13:49:09

xtreme2day.com
FoFDcnLsZgtjU 08-04-2025 06:16:55

xtreme2day.com
FHuUUDZhm 08-04-2025 15:23:11


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती