Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 महाराष्ट्र

नागपूरमध्ये रविवारी होणार राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी ; ४० मंत्र्यांची यादी निश्चित !

xtreme2day   14-12-2024 23:24:15   7885788

नागपूरमध्ये रविवारी होणार राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी ; ४० मंत्र्यांची यादी निश्चित !

 

मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) - उद्या दि.१५ डिसेंबर, रविवारी नागपुरात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकूण ४० आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या कार्यक्रमासाठी ५०० लोक उपस्थित राहतील अशी व्यवस्था करण्यात आल्याचीही  माहिती मिळाली आहे. 

 

५ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सरकार स्थापनेनंतर मंत्रिमंडळाबाबत सातत्याने चर्चा होत होती. कोणाला मंत्री केले जाणार, कोणते खाते दिले जाणार याबाबत सातत्याने चर्चा सुरू होती. यासंदर्भात 12 डिसेंबर रोजी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ज्यामध्ये कोणते मंत्रिपद कोणाला मिळणार आणि मंत्री होणार हे ठरले.

 

 या शपथ विधीमध्ये विदर्भातील नागपूर जिल्ह्याला दोन मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील राजभवनातील लॉनमध्ये होणाऱ्या या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये नागपूर जिल्ह्याला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. मात्र नागपूर जिल्ह्याला देण्यात येणाऱ्या दोन मंत्रिपदांपैकी एक भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची चर्चा आहे. बावनकुळे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचवेळी नागपूर जिल्ह्यातून दुसरे मंत्रिपद कोणाला दिले जाणार याबाबतही सस्पेन्स कायम आहे.

 

राजकीय इतिहासात नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 22 डिसेंबर 1991 रोजी छगन भुजबळ यांच्या सोबत डॉ. राजेंद्र गोडे, जयदत्त क्षीरसागर, वसुधा देशमुख आणि भरत बाहेकर यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्या वेळी नागपूरने राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घटनांचा भाग होऊन इतिहास घडवला. आता एक वेळ पुन्हा नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याच्या तयारीत आहे, आणि यामुळे शहराच्या राजकीय महत्त्वात आणखी भर पडेल.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
ztoqGKtu 15-12-2024 16:29:43

xtreme2day.com
cKEsEymCgSTWl 16-12-2024 15:18:10

xtreme2day.com
gUhEASKgBlGVt 20-12-2024 03:30:05

xtreme2day.com
AYyXzspdqCwGJW 22-12-2024 16:05:49


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती