चर्चांना पूर्णविराम ! देवेंद्र फडणवीस हेच असणार मुख्यमंत्री !! भाजपच्या वतीने 'ग्रीन सिग्नल' ; देव दिवाळीच्या दिवशी २ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा होणार शपथविधी
xtreme2day
29-11-2024 12:45:48
22289797
चर्चांना पूर्णविराम ! देवेंद्र फडणवीस हेच असणार मुख्यमंत्री !! भाजपच्या वतीने 'ग्रीन सिग्नल' ; देव दिवाळीच्या दिवशी २ डिसेंबरला मंत्रिमंडळाचा होणार शपथविधी
नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय पातळीवर सर्वंकष विचारविनिमय होऊन ; महाराष्ट्र राज्यातील राजकीय घडामोडीला वेगळे वळणं न देता देवेंद्र फडणवीस यांनाचं मुख्यमंत्रीपदावर स्थानापन्न करण्यात येईल, अशी काल रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची अधिकृत माहिती हाती आली आहे.
भाजपाच्या या निर्णयामुळे " कौन बनेगा मुख्यमंत्री ?" हा मुद्दा बाजूला सारून देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार आहे. सत्तास्थापना आणि मुख्यमंत्रिपदासंदर्भात काल रात्री दिल्लीत अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे, अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणविसांचं नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती आहे. यासाठीच्या सर्व प्रक्रिया लवकरच पार पडून औपचारिक घोषणा करण्यात येईल, अशी माहिती समोर येत आहे.
येत्या देव दीपावलीच्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची आणि शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजीत पवार उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्याशिवाय मंत्रिमंडळात सहभागी करण्यात येणाऱ्या इतरांना शपथ दिल्या जाणारं आहे. मोठ्या उत्साहात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, निर्मला सीतारामन, तसेच इतर महत्वाच्या नेते - पाहुण्यांना यावेळी निमंत्रित करण्यात येणार आहे. महायुती मधील भाजपचे २१, शिवसेनेचे ९ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ मंत्रिमंडळात असणार आहेत. एकूण ३८ जणांच्या या मंत्रिमंडळात अनुभवी व जाणकार नेत्यांना संधी मिळणार आहे अशी माहिती महायुती मधील वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून मिळाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून मुख्यमंत्री भाजपचाच होणार, ही अपेक्षा होती. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. परंतु, महाराष्ट्रातील राजकीय-जातीय समीकरणांचा विचार करता फडणवीसांना मुख्यमंत्रीपद मिळणार की नाही, याबाबत किंतु परंतु होते. परंतु, दिल्लीतील कालच्या बैठकीने हे किंतु-परंतु संपुष्टात आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना आता डेडलॉक संपला, असा शब्द वापरला. याचा अर्थ सत्तास्थापनेत तिढा होता, हे मान्य केले. कालच्या बैठकीनंतर हा डेडलॉक संपल्याचे एकनाथ शिंदे यांना मान्य केले, याचा अर्थ कुठेतरी नाराजी होती. ती आता नाही हे दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले, त्यामुळे आता स्वत:खडे उपमुख्यमंत्रीपद घेण्याशिवाय भाजपकडे कोणताही पर्याय उरलेला नाही. एक पक्ष म्हणून स्वत:चा विस्तार करणं हे भाजपसाठी महत्त्वाचे ध्येय आहे. इतकं मोठं यश मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांना शांत कसं बसवणार, पुन्हा त्यागाची भाषा करणे कठीण होते. त्यामुळे राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणे महत्त्वाचे होते. त्यानुसार आता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले आहे. मात्र, भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. रितसर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच आजचं मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुढील प्रक्रिया सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीसाठी लवकरच भाजपचे केंद्रीय निरिक्षक मुंबईत येऊन मुख्यमंत्रीपदी कोण असेल याचं नाव निश्चित करुन औपचारिक घोषणा करतील. तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनीही आपल्याला भाजप नेतृत्त्वाचा निर्णय मान्य असल्याचे सांगितले. आमची भूमिका मी काल जाहीर केली. महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा मी कालच दिलेला आहे. त्यामुळे तो डेडलॉक संपला आहे. आता भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल आणि त्यानंतर निर्णय होईल. सगळं व्यवस्थित होईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले .
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.