xtreme2day 17-04-2024 20:30:52 436941
१ हजार ४०० कोटींची संपत्ती, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट; पल्लवी डेम्पो यांनी दाखल केला दक्षिण गोव्यासाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज गोवा (विशेष प्रतिनिधी) - भाजपने दक्षिण गोवा मतदारसंघातून उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांच्या पत्नी पल्लवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पल्लवी यांचा अर्ज दाखल करताना राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपच्या दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार पल्लवी डेम्पो या उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अचानक चर्चेत आल्या आहेत. पल्लवी यांची संपत्ती १ हजार ४०० कोटी इतकी आहे. १ हजार ४०० कोटींची संपत्ती, दुबई-लंडनमध्ये अपार्टमेंट; या दक्षिण गोवा मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात पल्लवी यांच्याकडे १ हजार ४०० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले आहे. डेम्पो ग्रुपचा अनेक क्षेत्रात व्यवसाय आहे. ज्यात फुटबॉल लीग, रियल इस्टेट, जहाज निर्माण, शिक्ष आणि खाण उद्योगाचा समावेश आहे.