Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

पुण्यात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने सय्यद नगर - हांडेवाडीत मोठी खळबळ

Xtreme Today   23-11-2026 20:28:20   17342169

पुण्यात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने सय्यद नगर - हांडेवाडीत मोठी खळबळ

 

पुणे (प्रतिनिधी) - पुण्यात अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या पथकाला विरोध करत काही जणांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. तसेच कारवाईसाठी आणलेल्या जेसीबी मशीनलाही लक्ष्य करण्यात आले. पुण्यातील सय्यदनगर-हांडेवाडी परिसरात हा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

 

पुण्यातील सय्यदनगर-हांडेवाडी परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यासाठी संबंधित प्रशासनाचे पथक दाखल झाले होते. परिसरातील अतिक्रमणे हटवण्यासाठी जेसीबी मशीन आणण्यात आले होते. नियोजित कारवाईनुसार अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत होती. मात्र या कारवाईला काही स्थानिकांकडून विरोध करण्यात आला. कारवाई सुरू असतानाच परिस्थिती चिघळली होती. काही जणांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे, तर अतिक्रमण हटवण्यासाठी आणलेल्या जेसीबी मशीनवरही दगडफेक करण्यात आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. प्रशासनाच्या कारवाईदरम्यान झालेल्या या विरोधामुळे काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती