Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

बुलडोझर लगाव... अतिक्रमण हटाव! - पुणे मनपा आयुक्तांची विशेष मोहीम

Xtreme Today   20-11-2026 22:02:20   176924456

बुलडोझर लगाव... अतिक्रमण हटाव! - पुणे मनपा आयुक्तांची विशेष मोहीम

 

कोणाचाही मुलाहिजा न ठेवता संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका; लक्ष्मी रोड बाजीराव रस्ता शनिवार वाड्यापर्यंत बुलडोझरने अतिक्रमणे तोडली! 

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्रातील पुणे शहर हे अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाचे असे नावाजलेले शहर आहे. मुंबई पाठोपाठ पुणे हे व्यावसायिक पर्यटन शैक्षणिक औद्योगिक आणि आयटी आदी क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध आहे. परंतु पुण्याची वाहतूक व्यवस्था आणि शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावर असणारी अतिक्रम अतिक्रमणे यामुळे पुण्यात चालणेही अवघड झाले आहे. पण आता पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी धुरंदर भूमिका घेतल्यामुळे ही अतिक्रमणे बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात येत आहेत. यामुळे पुणेकर नागरिक सुखावले आहेत.

 

महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे आता नगरसेवकही धास्तावले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेच्या जनरल बॉडी मिटिंगमध्ये अतिक्रमण कारवाई होत नसल्यामुळे नगरसेवकांनी आंदोलन करत आयुक्तांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर शहरातील अतिक्रमणाला आयुक्त जबाबदार असून त्यांनाही सहआरोपी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी संपूर्ण पुणे शहरात अतिक्रमणविरोधी कारवाईचा धडाका लावला. 

 

महापालिकेतील अनेक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या कार्यकर्त्यांच्या दुकानांवर कारवाई झाली आहे, त्यांनी आता नगरसेवकांकडे तगादा लावला आहे. त्यामुळे ही कारवाई कशी मागे घेता येईल, याची चर्चा सभागृहातील नगरसेवकांमध्ये सुरू असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावरून बोलताना अरविंद शिंदे यांनी सभागृहात भाजपच्या नगरसेवकांची खिल्ली उडवली. “पुणे शहरात अतिक्रमण कारवाई होणे गरजेचे होते. या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांमध्येंच फुट पडली आहे. कुणाचाही चेहरा न बघता…याचा माणूस की त्याचा माणूस हे न पाहता कारवाई करावी. आयुक्तांवर जो कोणी दबाव आणत असेल तर त्याला एक्सपोज केले आहे पुणे शहराची कॅपिसटी संपली आहे,” असे म्हणत काँग्रेस नगरसेवक अरविंद शिंदे यांनी भाजपवर निशाणा साधला.

 

लक्ष्मी रोडवरील अतिक्रमण कारवाईमध्ये आमची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. उद्या महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत होतं असलेल्या बैठकीत भरपाई ही प्रमुख मागणी असणार आहे. पुण्यात लक्ष्मी रोडवरील सकाळपासून सुरू असलेली अतिक्रमणाविरोधी महानगरपालिकेची कारवाई आमच्यावर दडपशाही करून करण्यात आली अशा भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या.

 

तसेच कोणतीही नोटीस न देता कारवाई केली, असा आरोपही करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जागेची कागदपत्र दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कागदपत्र देखील पाहिले नाहीत, अतिक्रमणाला राजकीय वरदहस्त आहे का अशी देखील शंका व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे, थोडक्यात आता अतिक्रमणाच्या धडक कारवाईने पुण्यामध्ये चांगलाच वादंग पाहायला मिळत आहे.

 

दरम्यान, शहरातील या बुलडोझर कारवाईनंतर पुणे शहराच्या उपनगरातील व्यापारी धास्तावले आहेत. कात्रज, बालाजी नगर -  धनकवडी, बिबवेवाडी,  मार्केट यार्ड, स्वारगेट, शंकर शेठ रोड - पुणे कॅम्प - पुणे स्टेशन एरिया, वानवडी - फातिमानगर - कोंढवा,  हडपसर, मुंडवा, खराडी - वाघोली - चंदन नगर - विमान नगर व नगर रोड, आळंदी रोड - विश्रांतवाडी - येरवडा, सिंहगड रोड, कोथरूड - कर्वे रोड, इ. अशा महत्त्वाच्या विभागातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरवला जावा. अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. मनपा आयुक्त याबाबतीत काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरेल. या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्था असणारे तर शहराच्या सौंदर्यकरणास बाधा आलेली आहे. पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. सायकल स्वार - दुचाकी स्वार दररोज अपघातामध्ये बळी पडत आहेत. सम विषम पार्किंगची व्यवस्था राहिलेली नाही. त्यामुळे नगरसेवकांनी याबाबतीत नागरिकांची व आयुक्तांची साथ द्यावी व ही अतिक्रमणे बुलडोझरने पाडावीत अशी सर्व स्तरावर मागणी केली जात आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती