Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

‘शाळेत जाऊ या अभियान’ अंतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची अलिबाग तालुक्यातील शाळांना भेट

Xtreme Today   09-10-2026 20:05:10   3793260

‘शाळेत जाऊ या अभियान’ अंतर्गत शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची अलिबाग तालुक्यातील शाळांना भेट              

 

अलिबाग :-( डॉ. जयपाल पाटील, ब्युरो चीफ यांजकडून)   शैक्षणिक समस्या व सुविधांचा घेतला आढावा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान! महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री मा. श्री. दादाजी भुसे यांच्या कोकण दौऱ्याअंतर्गत ‘शाळेत जाऊ या अभियान’ अंतर्गत आज अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा मुशेत, किहीम आदिवासीवाडी, झिराड, बाना हायस्कूल आणि नवगाव या शाळांना भेट देण्यात आली. या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधून शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच शाळांमधील विविध अडचणी व समस्यांची माहिती घेण्यात आली.

शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शिक्षणविषयक विविध योजना आणि अभियानांची माहिती यावेळी देण्यात आली. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यात शैक्षणिक प्रगतीची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि शाळांच्या समस्या जाणून घेणे, या दृष्टीने या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले.

या दौऱ्यावेळी सोबत मा.ना.श्री. दादाजी भुसे ,मंत्री , शालेय शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. भरतशेठ गोगावले, कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मा. श्री. मधुकर पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. सौ. नेहा भोसले, शिक्षण सभापती मा. श्री. कळंबे, महिला व बालकल्याण सभापती मा. सौ. रसिका केणी, अलिबाग पंचायत समितीच्या सभापती मा. सौ. भाग्यता पाटील, उपसभापती मा. सौ. प्रिया भगत, रायगड जिल्हा परिषद सदस्य मा.सौ.मानसीताई दळवी ,मा. श्री. दिलीप भोईर ऊर्फ छोटमशेठ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या दौऱ्याचा समारोप अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन येथे करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, शाळांमधील पायाभूत सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात आणि प्रत्येक विद्यार्थ्याला उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण उपलब्ध व्हावे, हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे. शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्याच्या या उपक्रमामुळे शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न समजून घेण्यास मदत झाली.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती