Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन चे द्वैवार्षिक अधिवेशन संपन्न

Xtreme Today   02-10-2026 17:48:24   16872414

प्रेस - नोट

भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन चे द्वैवार्षिक अधिवेशन संपन्न

 

पुणे (प्रतिनिधी) - भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र रिटायर्ड एम्प्लॉइज ऑर्गनायझेशन (बोमरेओ) या बँक ऑफ महाराष्ट्र मधील निवृत्त कर्मचाऱ्यांचे द्वैवार्षिक अधिवेशन पद्मावती येथील "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह" येथे नुकतेच संपन्न झाले.

यावेळी संघटनेचे सरचिटणीस नारायण आचलेरकर यांनी संघटनेच्या स्थापनेपासूनचा २७ वर्षांचा इतिहास उपस्थित सभासदांना सांगितला.

१९९९ साली स्थापन झालेल्या ह्या संघटनेने २०२४ साली रौप्यमहोत्सव साजरा केला आहे.या काळात सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी सांगितली.

पूर्वांचल मधील मुलींना पुण्यात विविध प्रकारे आर्थिक मदत केली जाते,तळेगाव दाभाडे येथील संजीवनी वसतिगृहातील शाळकरी मुलींना ड्रेस साठी कापड आणि शिलाई साठी दरवर्षी रक्कम दिली जाते.सामाजिक कृतज्ञता निधी समर्पण साडे तीन कोटी रुपयांवर केले आहे हे आवर्जून सांगितले.सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना संघटनेतर्फे आर्थिक मदत केली जाते

शेतकऱ्यांसाठी कृषिमित्र ही बँकेतील निवृत्त कृषी अधिकाऱ्यांची एक चळवळ आहे.

राजगड तालुक्यातील गुहिनी या गावात कुक्कुट पालन आणि मधमाशी पालनासाठी हे सर्व अधिकारी मार्गदर्शन आणि आर्थिक साहाय्य करत असतात.या सर्व समाजकार्यासाठी सर्व निधी आमचे सभासद स्वतःच्या निवृत्तीवेतनातून देत असतात.सभासदांच्या पंचाहत्तरी निमित्त संघटनेकडून  सत्कार करून सन्मानित केले जाते.

संघटनेचे संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांनी दिलेल्या विचाराप्रमाणे ज्या समाजाने आपल्याला आज जी प्रतिष्ठा दिली आहे,त्या समाजाचे ऋण फेडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे असे अचलेरकर यांनी आवर्जून सांगितले.

कार्यकारी संचालक प्रभात किरण यांनी बोमरेओ संघटनेबद्दल गौरवपर उद्गार काढले.निवृत्त बँक सभासदांनी घातलेल्या भरभक्कम पायावर बँक ऑफ महाराष्ट्र उभी असून बँकेच्या भारतभर २८०० शाखा आता कार्यरत आहे.बँकेचा नक्त नफा सात हजार कोटीपेक्षा जास्त झाला आहे.असे त्यांनी नमूद केले.आणि रिझर्व्ह बँकेने बँकिंग संबंधी जी प्रमाणके आहेत ती सर्व पूर्ण केली आहेत असे प्रभात किरण यांनी आपल्या भाषणात सांगितले.

बँकेचे संचालक प्रसेनजीत फडणवीस म्हणाले,बँकर हा नोकरीत असतांना पगारी समाज सेवक असतो.पण निवृत्तीनन्तर देखील तो स्वखर्चाने (आपल्या निवृत्तीवेतनातून खर्च करून ) समाजासाठी विधायक कार्य करत असतो या बद्दल बँकेचे संचालक प्रसेनजीत फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.

"सामाजिक कृतज्ञता निधी" साडे तीन कोटी संकलित करून समाजासाठी समर्पण केला याबद्दल यांनी सभासदांचे अभिनंदन केले.आताचे बँकिंग हे पारंपरिक बँकिंगपेक्षा खुप वेगळे असून त्याच्याशी जुळवून घ्यायला हवे असा सल्ला त्यांनी निवृत्तांना दिला.

संघटनेत विविध जबाबदाऱ्या अनेक वर्षे समर्थपणे पार पाडणाऱ्या १९ जणांचा सत्कार संस्थापक बाळासाहेब फडणवीस यांच्या हस्ते करून गौरविण्यात आले.

कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्वर यांनी निवृत्तांच्या प्रश्नांबाबत बँकेचे व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असून निष्काळजीपणा दाखवत आहे,याची अनेक उदाहरणे दाखवून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.या अधिवेशनास भारतभरातून सातशे प्रतिनिधी उपस्थित होते.

याच अधिवेशनात पुढील दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी निर्वाचन अधिकारी मुकुंद भालेराव यांनी घोषित केली.त्यामध्ये मोहन घोळवे हे अध्यक्ष,नारायण आचलेरकर हे कार्याध्यक्ष तसेच डॉ.सुनील देशपांडे सरचिटणीस म्हणून राहतील.ही कार्यकारिणी पुढील दोन वर्षासाठी राहील.

व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे सागर पवार, बोमोच्या अश्विनी देव,महादेव शेडगे,भास्कर माणकेश्वर,डॉ चंद्रशेखर बारगजे यांची मुख्य उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात चंद्रशेखर बोरोले यांच्या श्रमिक गीताने झाली.सुमेधा दफ्तरदार यांच्या पसायदानाने अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.सूत्र संचालन शुभांगी कुलकर्णी यांनी केले.

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती