रायगड जिल्हा अध्यक्षपदी एडवोकेट गोपाळ शेळके यांची नियुक्ती
Xtreme Today
26-09-2026 22:05:47
5990277
रायगड जिल्हा अध्यक्षपदी एडवोकेट गोपाळ शेळके यांची नियुक्ती
कर्जत (डॉ. जयपाल पाटील ब्युरोचीफ यांजकडून ) तालुक्यातील किरवली गावचे रहिवासी समाजसेवक, ज्येष्ठ पत्रकार, आणि कुणब्याचं पोर मराठी चित्रपट निर्माते एडवोकेट गोपाळ गुंजा शेळके यांची रायगङ जिल्हाध्यक्ष म्हणून अखिल भारतीय कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर व्ही एस निरंजन प्रसाद आणी श्री. उमेश कुमार पटेल राष्ट्रीय महासचिव यांच्या मान्यतेने महाराष्ट्र अध्यक्ष श्री. संजय पाटील यांनी नियुक्तीपत्र दिले आहे.
एडवोकेट गोपाळ शेळके हे कर्जत तालुक्यातील समाज बांधवांच्या मुला मुलींसाठी नियमित शैक्षणिक उपक्रम, आरोग्याच्या बाबत शिबिरे, शेतकऱ्यांना मार्गदर्शन,व्यवसाय वृद्धीसाठी मार्गदर्शन, गोरगरीब जनतेला कायदेविषयक सल्ले, कोविड महामारी मध्ये अनेकांना सर्वतोपरी मदत, तालुक्यातील अनेक कलाकारांना एकत्र करून आपल्या संघर्षमय जीवनावर आधारित कुंड्याचं पोर मराठी चित्रपट निर्माण केला आणि तो सध्या प्रसिद्धीच्या मार्गावर आहे,
तसेच ते अखिल भारतीय कुणबी मराठा संघाचे संस्थापक प्रवर्तक असून त्यांचा कुणबी समाजामध्ये रायगड जिल्ह्यात दांडगा संपर्क आहे, त्यांचे कुणबी समाजातील युवक युवतींना मार्गदर्शन सेवा अतिशय महत्त्वाची असून त्यांचा आदर्श समाजातील युवकांनी घ्यावा, आपण करीत असलेली सेवा हीच ईश्वर सेवा असून याचा लाभ समाजासाठी द्यावा म्हणून त्यांची जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचे जिल्हाध्यक्षांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे. त्यांच्या या अध्यक्षपदी निवडीबद्दल, महाराष्ट्र प्रदेश महासचिव श्री. जगदीश शेलार पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष श्री संदीप काळे पाटील, रायगड जिल्ह्यातून नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनाचे दूरध्वनी येत आहेत
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.