Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

येत्या 4 ऑक्टोबर रोजी चाकण येथे अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय व कृत्रिम हाताचे मोफत मोजमाप शिबिर

Xtreme Today   21-09-2026 20:45:31   1683237

दिव्यांगांच्या स्वावलंबनासाठी भारत विकास परिषद दक्षिण पुणे शाखा व पिंपरी-चिंचवड शाखेच्या ‘स्व-आधार’ केंद्राचा उपक्रम

 

येत्या 4 ऑक्टोबर रोजी चाकण येथे अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय व कृत्रिम हाताचे मोफत मोजमाप शिबिर 

 

पुणे (प्रतिनिधी) - दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळावी, या उद्देशाने भारत विकास परिषद, दक्षिण पुणे व पिंपरी-चिंचवड शाखांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्व-आधार – Swanirbhar Divyang Help and Rehabilitation’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय व कृत्रिम हाताचे मोफत मोजमाप शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

हे शिबिर रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत, SKS Fastners Limited(Unit IV), Gat No. ८ व ९, वराळे ता. खेड, चाकण, पुणे येथे होणार आहे.

भारत विकास परिषद : सेवा आणि संस्कारांची राष्ट्रीय चळवळ

भारत विकास परिषद (BVP) ही सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीवर आधारित अराजकीय, सामाजिक-सांस्कृतिक स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेची स्थापना १२ जानेवारी १९६३ रोजी, स्वामी विवेकानंद यांच्या जन्मशताब्दी वर्षात झाली. त्यानंतर १० जुलै १९६३ रोजी भारत विकास परिषद ही संस्था सोसायटी म्हणून नोंदणीकृत झाली. 

भारत विकास परिषदेचे मूलभूत ध्येय ‘स्वस्थ–समर्थ–संस्कारित भारत’ घडविणे हे आहे. देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक, राष्ट्रीय आणि आध्यात्मिक विकासाला चालना देणे, तसेच समाजातील गरजू आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी सक्षम नागरिकांना सहभागी करून घेणे, हे परिषदेच्या कार्याचे प्रमुख आधार आहेत. 

 

परिषदेचे कार्य ‘संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण’ या पंचसूत्रांवर आधारित आहे. सेवा ही केवळ दानधर्माची कृती नसून समाजाप्रती असलेले कर्तव्य आहे, या भावनेतून विविध सेवा प्रकल्प राबविले जातात. 

 

आज भारत विकास परिषदेचे देशभर विस्तृत संघटनात्मक जाळे असून, अधिकृत माहितीनुसार १५९० शाखा आणि ८३९२४ सदस्य अशी २०२३-२४ मधील नोंद आहे. आरोग्य, शिक्षण, संस्कार, सामाजिक सेवा, दिव्यांग सहाय्य आणि सांस्कृतिक उपक्रम अशा विविध क्षेत्रांत परिषद कार्यरत आहे. 

स्व-आधार’ : दिव्यांगांना स्वावलंबनाकडे नेणारा उपक्रम

 

भारत विकास परिषदेच्या सेवा कार्यातील महत्त्वाचा भाग म्हणजे दिव्यांग सहाय्यता आणि कृत्रिम अवयव सेवा. गरजू दिव्यांग व्यक्तींना गुणवत्तापूर्ण कृत्रिम अवयव उपलब्ध करून देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात अधिक स्वावलंबन निर्माण करण्याचा या प्रकल्पाचा प्रयत्न आहे.

 

याच उद्देशाने भारत विकास परिषद दक्षिण पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘स्व-आधार’ केंद्रामार्फत अत्याधुनिक कृत्रिम अवयव मोफत उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जात आहे.

 

या उपक्रमात पारंपरिक कृत्रिम पाया ऐवजी अत्त्याधुनिक Modular Foot ज्याची बाजारातील किंमत ₹६०,००० च्या वर आहे, असे मोफत उपलब्ध करून देण्यावर भर दिला जातो. गरजेनुसार कृत्रिम हात, पोलिओ कॅलिपर आणि Ankle Foot Orthosis (AFO) यांसारखी उपकरणेही उपलब्ध करून दिली जातात.

 

 

६०० च्या वर लाभार्थींना आतापर्यंत सेवा

 

स्व-आधारच्या माध्यमातून मागील काही वर्षांत विविध ठिकाणी कृत्रिम अवयव शिबिरे घेण्यात आली आहेत. उपलब्ध नोंदीनुसार २०२५-२०२६ या कालावधीत विविध शिबिरांमधून एकूण ६०० च्या वर लाभार्थींना सेवा मिळाली आहे.

 

यामध्ये, महाराष्ट्रातील अहमदनगर (अहिल्यानगर), सांगली, कोल्हापूर, तळेगांव दाभाडे, यवत , कोंढणपूर-पुणे, बारामती आणि सातारा तसेच इतर राज्यातील बेळगांवी (कर्नाटक), मुझफ्फरपूर (बिहार), गुवाहाटी (आसम) आदी ठिकाणी झालेल्या शिबिरांचा समावेश आहे.

 

 

कोणाला मिळणार मोफत कृत्रिम अवयव?

 

ज्या दिव्यांग व्यक्तींनी पाय किंवा हात गमावला आहे, अशा लाभार्थ्यांना त्यांच्या जात, धर्म, वय किंवा आर्थिक परिस्थितीचा विचार न करता या सेवेसाठी विचारात घेतले जाते.

 

कृत्रिम अवयवामुळे व्यक्तीला घरातच मर्यादित न राहता पुन्हा दैनंदिन हालचाल, कामधंदा आणि रोजगाराच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमाचा उद्देश केवळ कृत्रिम अवयव देणे नसून दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावणे हा आहे.

 

 

चाकण येथील शिबिराची वैशिष्ट्ये

 

दिनांक : रविवार,४ ॲाक्टोबर २०२६

वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३

स्थळ : SKS Fastners Limited (Unit IV), Gat No. ८ व ९, वराळे, ता. खेड, चाकण, पुणे

 

शिबिरात:

 

अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पायाचे मोजमाप

कृत्रिम हाताचे मोजमाप

दिव्यांग व्यक्तीचे आवश्यक मूल्यमापन

कृत्रिम अवयवासाठी तांत्रिक प्रक्रिया व मार्गदर्शन

पात्र लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम अवयव

भविष्यातील दुरुस्तीची मोफत सेवा

दिव्यांग व्यक्ती व एका सोबतीसाठी भोजनाची सुविधा

जवळच्या मुख्य रस्त्यावरील बसस्थानकापासून वाहनाची सुविधा

मोजमाप घेतल्यानंतर ४ ते ५ आठवड्यानंतर प्रदान शिबिर आयोजित करून अवयवांचे *मोफत* प्रत्यारोपण केले जाईल.

लाभार्थींची संख्या मर्यादित असल्यामुळे पूर्वनोंदणी आवश्यक असून, प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

या व्यतिरिक्त संस्थेतर्फे एनिमिया निर्मूलन,रक्त साठवणूक केंद्र,वनवासी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, दिवाळी फराळ, शैक्षणिक मदत, गोसेवा, पर्यावरण रक्षण, वृक्षारोपण आदी महत्वपूर्ण प्रकल्प राबवले जातात. शाळशाळांमधून भारतबद्दलची Quiz Contest,देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा घेतल्या जातात. काही निर्धन कुटुंबांना शैक्षणिक, आर्थिक मदत देखील केली जाते. 

 

समाजातील नागरिकांना आवाहन

 

भारत विकास परिषदेच्या सेवा कार्याला समाजातील नागरिक, उद्योग, संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची आवश्यकता आहे. दिव्यांग व्यक्तीला कृत्रिम अवयव मिळणे म्हणजे त्याला केवळ एक उपकरण मिळणे नसून स्वावलंबनाची आणि आत्मसन्मानाची नवी संधी मिळणे होय.

त्यामुळे गरजू दिव्यांग व्यक्तींपर्यंत या शिबिराची माहिती पोहोचविण्यासाठी माध्यमांनी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहकार्य करावे,असे आवाहन शशिकांत पदमवार,जयंत जेस्ते यांनी केले आहे.

यांचेशी नोंदणी साठी संपर्क करावा

राजेंद्र पाध्ये : 9552618900

खानापुरकर : 9922991850

ई-मेल : [email protected]

 

आयोजक :

भारत विकास परिषद – दक्षिण पुणे व पिंपरी-चिंचवड शाखा

BVP South Pune (Parvati Section) Charitable Trust

स्व-आधार – स्वनिर्भर दिव्यांग हेल्प अँड रिहॅबिलिटेशन

“सेवा ही केवळ मदत नाही; ती समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे.”

सोबत पत्रकारपरिषद मध्ये माहिती देतांना शशिकांत पदमवार,जयंत जेस्ते.या पत्रकार परिषदेस भारत विकास परिषदेचे रवींद्र आठवले, फणिंद्र खानापूरकर,विभावरी खानापूरकर,माधव आफळे यांची उपस्थिती होती.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती