Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पिंपरी - चिंचवड

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांनी सर्व सामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचविले - संजय कुलकर्णी

Xtreme Today   14-09-2026 21:21:15   6587222

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांनी सर्व सामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचविले  - संजय कुलकर्णी 

 

पिंपळे सौदागर (प्रतिनिधी) - संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दिपिका हा ग्रंथ लिहून सर्वसामान्यांपर्यंत अध्यात्म पोहोचविण्याचे मोठे काम केले. त्यांचे हे कार्य लक्षात घेता अध्यात्मिक लोकशाहीचे जनक म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख करावा लागेल असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक संजय कुलकर्णी यांनी केले. 

 

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीनिमित्त पिंपळे सौदागर येथील श्री संत ज्ञानेश्वर ब्राह्मण संस्थेच्या मासिक सभेत ते बोलत होते. शनिवार दि. १२ रोजी सायंकाळी बाळासाहेब कुंजीर क्रिडांगणाच्या परिसरात हा कार्यक्रम झाला. प्रारंभी विलास भाले, अक्षय वडनेरकर, शैलजा लोकरस, मंगला कुलकर्णी , मीनाक्षी कुलकर्णी, अनुराधा निलेगावकर यांच्याहस्ते ज्ञानेश्वर महाराजांचे  प्रतिमा पूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले.

 

त्यानंतर उषा भागवत, शशिकांत कुलकर्णी, मीनाक्षी कुलकर्णी यांनी भक्तीगीते सादर केली. अक्षय वडनेरकर यांनी घरातील प्रत्येक  कुटुंबप्रमुखाने पुढील पिढीला आपल्या घराण्याची परंपरा, चालीरीती , कुलधर्म याबाबत माहिती देण्याचे आवाहन केले. भाग्यश्री गोखले यांनी संस्थेतील  सभासदांच्या कुटुंब सहलीचे वर्षांतून एकदा नियोजन करण्याची सुचना मांडली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कुलकर्णी यांनी केले. अध्यक्षीय समारोप विलास जोशी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन स्नेहा चिंचवडकर यांनी केले.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती