Xtreme Today 14-09-2026 21:06:05 3589787
घनश्याम भगवानराव निम्हण यांची पुणे शहर काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती; मा. मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान पुणे (प्रतिनिधी) - पुणे शहर काँग्रेसची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या उद्देशाने आज काँग्रेस भवन, पुणे येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात *घनश्याम भगवानराव निम्हण* यांची पुणे शहर काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. मा. मंत्री तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष *विश्वजित कदम* यांच्या हस्ते निम्हण यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला शहर काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विश्वजित कदम यांनी सांगितले की, "घनश्याम निम्हण हे अनेक वर्षांपासून पक्षासाठी एकनिष्ठपणे काम करत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याचा आणि संघटन कौशल्याचा फायदा पुणे शहर काँग्रेसला होईल. आम्ही त्यांच्याकडे मोठी जबाबदारी सोपवत आहोत." नव्याने नियुक्त झालेले सरचिटणीस घनश्याम निम्हण म्हणाले, "पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडेन. काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करेन." पक्ष बांधणीवर भर यावेळी काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात पक्षाच्या आगामी रणनीतीवर चर्चा झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात संघटन मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी घनश्याम निम्हण यांच्या नियुक्तीचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.