Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

वनवासी बांधवांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या व भारत सरकारने २०२६ वर्षासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांचा सत्कारक्षेत्रातील कार्य म्हणजे समाज परिवर्तनाचे प्रेरणादायी नेतृत्व

Xtreme Today   16-08-2026 20:19:11   1164841

वनवासी बांधवांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या व भारत सरकारने २०२६ वर्षासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांचा सत्कार

 

पुणेः( प्रतिनिधी) - वनवासी बांधवांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित केलेल्या व भारत सरकारने २०२६ वर्षासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले यांचा सत्कार समारंभ केशव माधव विश्वस्त निधी तर्फे कर्वेनगर येथील "शैलेश" सभागृहात संपन्न झाला.

छत्तीसगड मधील अतिदुर्गम भागात बस्तर येथे गेले पस्तीस वर्षापासून निस्वार्थी भावनेने वनवासी बांधवांच्या आरोग्यसेवेसाठी कार्य करणारे आयुर्वेदाचार्य डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनिता गोडबोले यांना त्यांच्या अतुलनीय सेवेबद्दल भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले त्याप्रीत्यर्थ सत्कार आयोजित करण्यात आला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक यांचे हस्ते शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केशव माधव विश्वस्त निधीतर्फे गोडबोले दांपत्याचा सत्कार करण्यात आला.ह्या प्रसंगी केशव माधव विश्वस्त निधीचे अध्यक्ष रविंद्र जावळे,एअर मार्शल प्रदीप बापट (निवृत्त),सचिव अरविंद देशपांडे यांची मुख्य उपस्थिती होती.

डॉ गोडबोले दांपत्याच्या सेवा यज्ञाच्या प्रेरणादायी प्रवास,वनवासी समाजातील अनुभव,आणि समाजकार्यासाठी त्यांची असलेली प्रेरणा व संघर्षाची गाथा ह्या प्रकट मुलाखतीतून स्पष्ट दिसून आली.नाट्यकलावंत प्रशांत कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली.मुलाखतीनंतर उपस्थित नागरिकांनी त्यांना काही प्रश्न विचारले डॉ रामचंद्र गोडबोले व  सौ सुनीता गोडबोले यांनी समर्पक उत्तरे दिली.

सत्काराला उत्तर देतांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले आयुर्वेदाचार्य डॉ रामचंद्र गोडबोले म्हणाले,वनवासी बांधवांसाठी कार्य करण्याची प्रेरणा दामूअण्णा दाते,भास्करराव कळंबी,बाळासाहेब दिक्षीत,यांचेकडून मिळाली.आदिवासी समाज खूप मेहनती आहे,प्रामाणिक आहे त्यांच्यामध्ये प्रचंड सहनशक्ती आहे तसेच त्यांच्यामध्ये

साधेपणा,प्रामाणिकपणा आढळतो. "कुपोषण मलेरिया,क्षयरोग व रक्तक्षयमुक्त बस्तर हे माझे स्वप्न आहे.वनवासी समाज बांधवांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे तसेच त्यांना निरोगी ठेवणे व समाजामध्ये आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहू"

या वनवासी बांधवांसाठीच्या सामाजिक कार्यामध्ये समाजातील सर्वांनी प्रत्यक्ष मदत करावी असे आवाहनही डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनीता गोडबोले  यांनी या वेळी केले.

सौ सुनीता गोडबोले यांनी "आदिवासी समाजबांधवांनी दुःखे समजवून घेण्यासाठी संवेदनशीलता असावी लागते तसेच त्यांची स्थानिक भाषा अवगत करावी लागते.वनवासी क्षेत्रातील कार्य करण्याची प्रेरणा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रचनात्मक कार्यातून मिळाली.त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांच्या आरोग्याकडे अधिकाधिक लक्ष देण्याचे काम गेले पस्तीस वर्षापासून करत आहोत.त्यामुळे बस्तर भागात अधिक कार्य करण्याची प्रेरणा आम्हाला मिळत आहे"असे यावेळी प्रतिपादन केले.

 

|चौकट|

 

याच कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय बुद्धिबळपटू व नामांकित बुद्धिबळ प्रशिक्षक मकरंद वेलणकर यांनी बुद्धिबळ या विषयामध्ये (PH. D) बालाजी विद्यापीठाची पीएच. डी.मिळविल्याबद्दल केशव माधव विश्वस्त निधीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला केशव माधव ह्या संस्थेमार्फत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती संस्थेच्या विश्वस्त कविता शेंडे यांनी दिली.सूत्र संचालन नाट्यकलावंत प्रशांत कुलकर्णी यांनी केले.प्राची पाठक ह्यांनी संपूर्ण "वंदे मातरम्" गायिले.आभार विश्वस्त प्रकाश देशपांडे यांनी मानले.कार्यक्रमास नागरिक,विद्यार्थी,वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी,"वनवासी कल्याण आश्रम"चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------

फोटो -

केशव माधव विश्वस्त निधीतर्फे पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ रामचंद्र गोडबोले व सौ सुनिता गोडबोले यांचा सत्कार करतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्वेनगर संघचालक उदयन पाठक.केशव माधव चे विश्वस्त योगेश देशपांडे,योगेश कुलकर्णी,संजय वळसंगकर,प्रशांत कुलकर्णी,कविता शेंडे,रविंद्र जावळे,अरविंद देशपांडे,प्रकाश देशपांडे

--------------

 


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती