शिर्डीतील खा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासोबत रोटेगाव– उक्कडगाव – संवत्सर रेल्वेमार्गावर सविस्तर चर्चा, दिल्लीतील अधिवेशनात मांडणी करण्याचे आश्वासन,
Xtreme Today
16-08-2026 13:27:52
3952653
शिर्डीतील खा. भाऊसाहेब वाघचौरे यांच्यासोबत रोटेगाव– उक्कडगाव – संवत्सर रेल्वेमार्गावर सविस्तर चर्चा, दिल्लीतील अधिवेशनात मांडणी करण्याचे आश्वासन

शिर्डी (प्रतिनिधी) - रोटेगाव–उक्कडगाव–संवत्सर–कोपरगाव (शिर्डी) या प्रस्तावित २२ कि.मी. नवीन रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी आज शिर्डी येथे खासदार मा. भाऊसाहेब वाघचौरे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी या प्रकल्पासंदर्भातील महत्वाच्या तांत्रिक बाबी सांगण्यात आल्या व सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.
या भेटीमध्ये सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पिल्दे आणि अनिल तुपे, हे होते तर साई प्रसाद जायभाय (स्वीय सहाय्यक) खासदार शिर्डी उपस्थिती होते. यावेळी या रेल्वेमार्गाच्या तांत्रिक, आर्थिक, सामाजिक आणि नव्या धार्मिक पर्यटनाशी संबंधित विविध पैलूंवर सखोल चर्चा करण्यात आली.
चर्चेदरम्यान खासदार भाऊसाहेब वाघचौरे साहेब यांनी सांगितले की, या प्रकल्पासाठी त्यांनी यापूर्वीही अनेक वेळा पाठपुरावा केला असून, राज्य सरकारने देखील सध्या या प्रकल्पातील अनेक तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत. असे निदर्शनात आणून दिले व त्यामुळे या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्यासाठी संबंधित स्तरावर सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील.
या विषयाची दिल्ली येथे होणाऱ्या संसदेच्या पुढील अधिवेशनात मांडणी करून.. तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
रोटेगाव –उक्कडगाव– संवत्सर हा केवळ २२ कि.मी.चा प्रस्तावित नवा रेल्वेमार्ग असला तरी, या मार्गामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावरील अंदाजे १५० ते १६० कि.मी.चा अतिरिक्त वळसा कमी होण्याची क्षमता निर्माण होऊ शकते.
या रेल्वेमार्गामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि दक्षिण भारतातील लाखो साईभक्तांना शिर्डीपर्यंत अधिक जलद आणि सुलभ रेल्वे संपर्क उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळून साहेबांच्या मतदार संघातील धार्मिक उक्कडगाव परिसरातील प्राचीन देवी मंदिर, स्थानिक पर्यटन, कृषी क्षेत्र, उद्योग, मालवाहतूक आणि रोजगारनिर्मितीलाही मोठी गती मिळू शकते.
या प्रकल्पाकडे केवळ नवीन रेल्वेमार्ग म्हणून न पाहता, शिर्डी, मराठवाडा, अहिल्यानगर आणि दक्षिण भारताला जोडणारा राष्ट्रीय महत्त्वाचा विकास प्रकल्प म्हणून पाहण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी भविष्यातही सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार असल्याचे रामचंद्र पिल्दे, आणि अनिल तुपे यांनी सांगितले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.