Xtreme Today 16-08-2026 13:21:01 1735770
बिनशेती मंजुरीसाठी विकास कामाच्या निधी पैकी 80 टक्के रक्कम ग्रामपंचायतीना मिळावी- सौ मानसी दळवी अलिबाग (डॉ. जयपाल पाटील यांजकडून) - संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे तोडण्याकरता व नियंत्रण करण्यासाठी शासनाने २० टक्के निधी घेऊन 80 टक्के निधी ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी वापरण्यात द्यावा अशी मागणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सौ. मानसी दळवी सदस्या रायगड जिल्हा परिषद यांनी पत्राद्वारे केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे त्यांनी मागणी केली असता हा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा प्रश्न असून राज्याचे प्रधान सचिव नगर विकास विभाग यांचे दिनांक एक एप्रिल 2021 चे १२२९ नुसार ग्रामपंचायत हद्दीतील बिनशेती मंजुरीसाठी आकारण्यात येणारा निधी वर्ग करणे बाबत महसूल विभागाचा संमतीने विचार शासनाच्या विचाराधीन आहे यातील 50 टक्के रक्कम ग्रामपंचायत हद्दीतील अनुधिकृत बांधकाम तोडण्यासाठी व नियंत्रणासाठी खर्च शासनातर्फे करण्यात येणार असून सर्व ग्रामपंचायतींना हा निधी ८० टक्के देण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी पत्र दिले आहेत. यामध्ये ग्रामपंचायत मध्ये खऱ्या अर्थाने विकास ग्रामपंचायत करीत असते त्यामुळे विकासासाठी 80 टक्के निधी लवकरात लवकर मिळावा अशी मागणी सौ.मानसी दळवी यांनी केली आहे. याबाबतचा शासनाचा दिनांक १ एप्रिल 2021 निधी एफ १२२१/७०/२१ महाराष्ट्र शासन नगर विकास विभागानुसार लवकरात लवकर निर्णय व्हावा त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना याचा लाभ होणार आहे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना मागणी पत्र दिल्याबद्दल सौ. मानसी दळवी यांचे प्रत्यक्ष भेटून व फोन द्वारे अभिनंदन करीत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना विकासासाठी दंडीत रकमेमुळे अतिशय लाभ होणार आहे.