Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

नशा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

Xtreme Today   10-08-2026 20:20:51   3762005

नशा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ       

 

अलिबाग (प्रतिनिधी) - प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय माउंट अबू आणि भारत सरकारच्या सहयोगाने ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त संपूर्ण देशभरात नशा मुक्त भारत अभियान सुरू करण्यात आले असून अलिबाग केंद्रातर्फे जिल्हा कारागृहात शुभारंभ करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर केंद्रप्रमुख भारतीय दीदी अंजू दीदी रायगड भूषण प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील मेडिकल कॉलेजचे डॉक्टर संतोष वाघमोडे उपस्थित होते.

 

प्रारंभी अंजू दीदी यांनी संपूर्ण देशभरात आज पासून नशा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ झाला असून अलिबाग तालुक्या त जिल्हा कारागृहात सुरुवात होऊन तालुक्यात अनेक मार्गदर्शक आम्ही बोलवणार आहोत.यानंतर भारती दीदी यांनी जनतेमध्ये काही लोकांना व्यसनाने जडलेले असते त्याचा त्रास त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होतो यासाठी  प्रजापिता ब्रह्माकुमारी आणि भारत सरकारने संपूर्ण देशभरात नशा मुक्त भारत अभियानाचे आयोजन केले आहे आणि हा कार्यक्रम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड साठी ठरणार आहे.

 

यावेळीप्रमुख पाहुणे प्राध्या. डॉ. जयपाल पाटील यांनी आपण जेलमध्ये का आलास एकतर आपणास नशा करण्याची सवय असेल किंवा अतिशय राग आल्यावर होऊन दुसऱ्याला त्रास दिला असेल यामुळे कायद्यानुसार आपण येथे आला आहात यामुळे आपल्या कुटुंबाचे जीवन किती दुःखमय झाले असेल याचा विचार करा जीवनात चुका सर्वांकडून होत असतात त्याचा निरसन जेलमधून घरी गेल्यावर कुटुंब आणि समाजसेवा करण्याचे ठरवा रागावर नियंत्रण ठेवा यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्रात अवश्य भेट द्या.अशा आपल्या जीवनात आपत्या येत राहतात त्याचा कधीही विचार करू नका, घराकडून कामावर जाताना अथवा शेतावर जाताना रस्त्यामध्ये अपघात झाला तर 108 रुग्णवाहिकेला त्वरित बोलवा आणि जखमींना सहकार्य करून समाजसेवा करा आकाशातील विजा चमकतात व त्या पडतात त्याच्यामुळे मनुष्य व प्राण्यांच्या जीवित हानी होते यासाठी केंद्र सरकारने दामिनी ॲप ची निर्मिती केली आहे ज्यामुळे आपल्यापासून किती अंतरावर वीज कोसळणार आहे याची माहिती होऊन आपण सुरक्षित राहाल व इतरांनाही सुरक्षित ठेवाल कारण जीवन अनमोल आहे शेवटी त्यांनी लाडू ही कविता सादर केली आणि कैदी बांधव आनंदित झाले. 

 

डॉ. संतोष वाघमोडे यांनी नशाबंदी वर सर्वांसहित शपथेचे वाचन केले, आपल्या आरोग्याकडे कायम लक्ष देऊन स्वच्छतेची कास पकडा असे त्यांनी सांगितले आणि जेलर कैदी बंधू व भगिनींचे त्यांनी आभार मानले यावेळी 210 कैदी बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्था सुभेदार श्री. हेडली  राजळ, हवालदार श्री. शैलेश सावंत, शिपाई श्री. गजानन खवले यांनी केली होती.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती