Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 रायगड

रायगडातील कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना संधी; थांबा पेंड स्थानकात मिळाला!

Xtreme Today   04-08-2026 19:10:26   4164013

रायगडातील कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना संधी; थांबा पेंड स्थानकात मिळाला!

          अलिबाग प्रतिनिधी -- रायगडातील कोकणात जाणाऱ्या पर्यटक उद्योजक सेवानिवृत्त कर्मचारी यांच्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री श्रीमती अश्विनी वैष्णवी यांच्याकडे खासदार नरेश मस्के आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागणी केली होती त्याला मंजुरी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने दिली आहे.

 

मुंबई ते सावंतवाडी क्रमांक १५०८७ असून सावंतवाडी मुंबई क्रमांक१५०८८ असून ही दररोज धावणार आहे.यामुळे पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रायगड ऐन गणपती साठी भेट मिळाली आहे.ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वररोड, रत्नागिरी, अडावली, वालीवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ सावंतवाडी येथे थांबणार आहे. विशेष म्हणजे कोकणात जाणाऱ्या अलिबागच्या  रेल्वे प्रवाशांना रात्री अप रात्री पनवेल आणि रोहा रेल्वे स्थानकात जावे लागत असे त्यामुळे मानसिक वार्षिक त्रास सहन करावा लागत असे असे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या माननीय खासदार आणि रेल्वे मंत्राकडे जात होत्या आता या रेल्वे गाडीचा थांबा पेंड स्थानकात मिळाल्यामुळे अलिबाग तालुक्यातील अनेक रेल्वे प्रवासी कोकणात जाणारे यांना दिलासा मिळाला आहे.

 

अलिबाग रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष प्राध्यापक श्याम जोगळेकर, सचिव जेष्ठ पत्रकार प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील, डॉ संदीप वारगे, आणि नियमित कोकणात जाणारे रेल्वे प्रवासी यांनी दोन्ही खासदार नरेश मस्के आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांचे, अलिबाग रेल्वे प्रवासी संघ आणि पेन रेल्वे प्रवासी संघाने आणखी एका गाडीचा थांबा पेंड रेल्वे स्थानकात मिळाल्याबद्दल  अभिनंदन केले आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती