Xtreme Today 01-08-2026 12:57:48 5378184
पोलिसांनी जनतेची सेवा करताना आपल्या वर्दीची शान ठेवावी-- प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील अलिबाग (प्रतिनिधी) - आपल्याला काहीतरी करायचं आहे आई-वडिलांची पुण्याई व आपला अभ्यास या जोरावर आपण पोलीस खात्यात देश सेवा करण्यास तयार झालात, मात्र नोकरी करताना कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करू नये ज्यामुळे आपल्यावर व आपल्या संपूर्ण कुटुंबावर आपत्ती येऊन एका क्षणिक चुकेमुळे जीवन उध्वस्त होऊ शकते यासाठी कायम काळजी घ्या असे मार्गदर्शन रायगड पोलीस दलाच्या पहिल्या उजळणी वर्गात आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी सांगितले त्यांच्यासोबत व्यासपीठावर रायगडचा युवक फाउंडेशनच्या शिक्षण विभागाचे प्रमुख डॉक्टर संदीप वारगे, प्राध्यापक संतोष पाटील रायगड पोलीस मुख्यालयाच्या सुरक्षा विभागाच्या श्रीमती संगीता बोचरे एपीआय ह्या उपस्थित होत्या.प्रारंभी श्री. मुळेश वनकाटे, तायडे परिमंडळ वन अधिकारी कार्ला, यांनी संविधान वाचन केले आणि प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांचा परिचय डॉक्टर संदीप वारगे यांनी करून दिला आज येथे आलेले सर्व उजळणी वर्गाचे प्रतिनिधी हे रायगड पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी आहेत आपण सारे जण उत्कृष्ट काम आणि सेवा करा आपल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कांचन दलाल आपले आपले निश्चितच कौतुक करतील त्यांना आपले काम योग्य करणाऱ्यांकडे लक्ष असतेच आणि बाजारात जात असताना रस्त्यावर अचानक अपघात झाला तर१०८ ला त्वरित पाचारण करावे सध्या रायगड जिल्ह्यात सुमित एस. एस. जी. या रुग्णवाहिकेचे काम ही कंपनी करीत असून त्यांचे जिल्हाप्रमुख श्री. आदित्य कानडा यांनी डॉक्टर जयप्रकाश पांडे यांना फोन करतात १०८ रुग्णवाहिका घेऊन पायलट श्री.धर्मा पाटील हे हजर झाले त्याचबरोबर आपण बीट अंमलदार म्हणून खेडेगावांमध्ये जाता कधी तक्रारीचे निरसन करण्यास जाता अशावेळी गावातील महिलेला बाळंतपणासाठी रुग्णालयात न्यायचे असेल तर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची १०२ रुग्णवाहिकेस दूरध्वनी करावा. यासाठी फोन करतात जिल्हा रुग्णालयातून डॉक्टर अनुप पळसकर हे त्यांचे पथक घेऊन आले व त्यांनी सुरक्षित बाळंतपणाविषयी मार्गदर्शन केले.आपण तपासा कामी खेडेगावात जात येत असताना गावा शेजारच्या जंगलात आग लागलेली दिसताच राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होऊ नये व पर्यावरणाला मदत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वनखात्याच्या १९२६ या क्रमांकावर संपर्क साधावा फोन लागताच अलिबाग वन अधिकारी श्रीयुत मुळेश वनकाटे, तायडे व त्यांचेश्री.किरण वसंत कळमकर वनरक्षक परहुर,श्री.राम लक्ष्मण टाकरस वनरक्षक वाडगाव, श्रीम.आकांक्षा सोमनाथ खांडवे वनरक्षक मान तर्फे झिराड, श्रीम.कावेरी प्रतिप दराडे वनरक्षक कार्ला. सहकारी हे अद्यावत मशीन घेऊन हजर झाले व आग विझवण्याचे प्रत्यक्षिक देऊन श्री. तावडे यांनी आधी संबंधी मार्गदर्शन केले.यावेळी प्राध्यापक संतोष पाटील यांनी पोलीस बांधवांनी आपल्या मुलांना मोबाईल आपत्ती बाबत मार्गदर्शन केले तर डॉक्टर संदीप वारगे यांनी आपल्या मुलांनी शिक्षण घेताना त्यांच्यावर जबरदस्ती पालक म्हणून करू नये त्यांच्या कलानी आणि बुद्ध्यांकानीच शिक्षण द्यावे ज्यामुळे त्यांची आणि कुटुंबाची प्रगती होईल असे सांगितले. आभार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिलीप सरांगे यांनी मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यास पोलीस हवालदार श्रीमती राजश्री दवणे आणी प्रशिक्षक श्री. हले काना त्यांनी मेहनत घेतली.