Xtreme Today 17-07-2026 18:39:02 165991
अलिबाग सां.बा.चा भोंगळ कारभार ? खानाव जवळील रस्ता १५ दिवस तयार होतोय ! अलिबाग (डॉ.जयपाल पाटील याजकडून) - तालुक्यातील नेहमी वरदळीचा अलिबाग रोहा रस्त्यावरील पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे खानाव जवळील पुलाला खड्डा पडल्यामुळे अलिबाग होऊन रोह्याला जाणाऱ्या प्रवाशांना 8 किलोमीटरचा फेरा टाकून वावे फाट्यावर यावे लागते यामुळे प्रवासी खाजगी वाहने यांना मानसिक त्रास व डिझेल पेट्रोलचा खर्च वाढल्याने अलिबाग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या या ढिसाळ कारभारामुळे सर्वत्र चर्चा होत आहे. या परिसरात गेल कंपनी असून येथील कर्मचारी अधिकारी, कंत्राटदार आणि शेतकरी यांना ८ किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते, मोटरसायकल स्वरांना मात्र खानाव गावातील अंतर्गत रस्त्यावरून जाता येते, चार चाकी नाही कारण ग्रामस्थ व लहान मुले यांच्या सुरक्षेसाठी रेवदंडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी होमगार्ड ठेवले आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कर्मचारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दलची चर्चा परिसरात होत आहे. जिल्हा आपत्ती प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी रायगड श्री. किसन जावळे यांनीही या आपत्तीकडे लक्ष घालावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.