'सिनिअर जर्नालिस्ट फेडरेशन'च्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वैद्य यांची तर युएनआयचे श्रीप्रकाश पांडे, प्रमोद शाह उपाध्यक्षपदी निवड
xtreme2day
14-07-2026 21:25:20
6835076
'सिनिअर जर्नालिस्ट फेडरेशन'च्या जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वैद्य यांची तर युएनआयचे श्रीप्रकाश पांडे, प्रमोद शाह उपाध्यक्षपदी निवड
पुणे, दि.14 (प्रतिनिधी) - ज्येष्ठ पत्रकारांसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ' सिनिअर जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ इंडिया' (एसजेएफओआय ) महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद वैद्य यांची तर उपाध्यक्षपदी 'यु.एन.आय.' चे पत्रकार श्रीप्रकाश पांडे व ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार प्रमोद शाह यांची निवड करण्यात आली. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय जोशी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले .
पुण्यात सोमवारी (दि. १३ जुलै ) झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा, शहर व पिंपरी चिंचवडच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. बैठकीत पत्रकार चंद्रकांत कांबळे यांची जिल्हा सचिव या पदासाठी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीस संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुनिल रावडे, ॲड. ओंकार माने, पत्रकार नितीन येलमार तसेच पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहरातून सभासद उपस्थित होते.
राज्य सरकारकडे ज्येष्ठ पत्रकारांच्या पेन्शनचे जवळपास चारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यासह नवीन प्रस्ताव सादर करून त्याचा पाठपुरावा करणे, पत्रकारांना व त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे, त्यांना वाजवी दरात घरे उपलब्ध करून देणे, एसटी बस व रेल्वे प्रवास सवलत देणे, अधिस्विकृती पत्र मिळवून देणे या सारख्या प्रश्नांवर 'एसजेएफओआय' संघटना काम करत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
वय वर्षे ५५ पुढील कोणताही पत्रकार संघटनेचा सभासद होऊ शकतो. ज्येष्ठ पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने संघटनेचे सभासद व्हावे, असे आवाहन राज्य सरचिटणीस संजय जोशी यांनी यावेळी केले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.