शेतकऱ्यांनी आपत्तीच्या काळात 108 रुग्णवाहिकेचा वापर करावा - प्रा. डॉ. जयपाल पाटील
xtreme2day
06-07-2026 20:16:17
8920363
शेतकऱ्यांनी आपत्तीच्या काळात 108 रुग्णवाहिकेचा वापर करावा - प्रा. डॉ. जयपाल पाटील

अहल्यानगर - जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून पर महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे सामाजिक व कृषी क्षेत्रात कार्यरत असलेले निस्वार्थी आदर्श व्यक्तिमत्व अलिबागचे गुणवंत कामगार, आदिवासी सेवक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारार्थी रायगड भूषण, प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांनी राज्यस्तरीय समाज भूषण संस्थापक यादवराव पावसे यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. सचिव अध्यक्ष रोहित पवार संपर्कप्रमुख अमोल शेवाळे यांच्या शुभहस्ते देण्यात आले त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार फेडरेशन महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष श्री. ओम प्रकाश शिंदे, सरचिटणीस श्री.संजय जोशी, रायगड उपाध्यक्ष श्रीमती भारती शहा, श्री.विकास रणपिसे, आपत्ती सुरक्षा मित्र उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच शेती उद्योजक समाजसेवक मान्यवरांच्या हस्ते ४० जणांना माऊली सभागृहात देण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक ज्येष्ठ पत्रकार यादवराव पावसे यांनी प्रास्ताविकात सरपंच सेवा संघाची माहिती व कार्याचा आढावा दिला. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत सादर करून झाली.
प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी रस्त्यावर आणि शेतावर अपघात झाल्यास महाराष्ट्र शासन आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड ची 108 रुग्णवाहिका चा मोफत वापर करावा, शेतकऱ्यांनी आपल्या मुलींच्या सुरक्षित बाळंतपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य खात्याची१०२ रुग्णवाहिका चा मोफत वापर करावा महिलां व मुलींच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करावा.
त्याचबरोबर आकाशातील वीजांसाठी आपल्या मोबाईलवर दामिनी ॲप डाऊनलोड करावा अशी माहिती देऊन राज्यभरात अनेक महिला सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेले आहेत. पंचायतीची सभागृह विकास अधिकारी सकाळी 11 वाजता लावतात यावेळी महिलांचे पतीदेव कामानिमित्त, शेतावर अथवा मुले शाळेमध्ये जाण्याच्या गडबडीत असल्याने जेवण करण्याची वेळ असते, म्हणून ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र शासन यांच्याकडे ग्रामपंचायतीच्या मीटिंग दुपारी ३ वाजता घेण्यात यावात अशी मागणी प्राध्यापक डॉ. जयपाल पाटील यांनी केली याची माहिती ही त्यांनी दिली. शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्री. रोहित पवार यांनी आभार मानले.
बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.