Bearing Witness To The Truth; We Will Act, Who Will Speak !
 दिनविशेष

 पुणे शहर

पुण्यात रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी रस्त्याखालून एकूण 54 किमी लांब भुयारी मार्गाचे जाळे; येरवडा ते कात्रजदरम्यान दुमजली भूमिगत मार्ग

xtreme2day   28-05-2026 22:30:42   3513066

पुण्यात रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी रस्त्याखालून एकूण 54 किमी लांब भुयारी मार्गाचे जाळे;  येरवडा ते कात्रजदरम्यान दुमजली भूमिगत मार्ग

 

पुणे (विशेष प्रतिनिधी) - पुण्यात रस्त्यांवरील ताण कमी करण्यासाठी रस्त्याखालून मार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. एकूण 54 किमी लांब भुयारी मार्गाचे जाळे असून यावरील येरवडा ते कात्रजदरम्यान दुमजली भूमिगत मार्ग तयार करण्यात येतील. कात्रज ते येरवड्यादरम्यानच्या भूमिगत रस्त्याचा आराखडा अंतिम टप्प्यात पोहोचला असून, जमिनीवरील दुहेरी उड्डाणपुलाप्रमाणेच भूगर्भात दोन स्तरांचा भूमिगत मार्ग (डबल डेकर ट्विन टनेल) निर्माण करण्याची योजना तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारात केलेल्या घोषणेनंतर या भुयारी मार्गांसाठी एकेक पाऊल पुढे टाकले जात आहे.

 

 

येरवडा कात्रजसह एकूण ५४ किलोमीटरच्या भुयारी रस्त्यासांठी ३६,४१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ५४ हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागेल, असा प्राथमिक अंदाज आहे. या भुयारी मार्गांमध्ये आपत्कालीन स्थितीत सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार (एस्केप रूट) असतील. ‘मोनार्क सर्व्हेअर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टन्सी’ यांनी तयार केलेल्या या आराखड्यात वाहतुकीची सद्यस्थिती, भविष्यात होणारी वाहतूक वाढ, बोगद्याचे पर्याय, आर्थिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे. ही सर्व माहिती राज्य सरकारला सादर करण्यात आली असून, या प्रकल्पासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) स्थापना करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. 

 

 

या सल्लागार संस्थेने या अभ्यासासाठी पुण्यातील ४५ ठिकाणी २४ तास वाहनांची मोजणी, वळण घेणाऱ्या वाहनांची संख्या, प्रवास चालू आणि प्रवास बंद होणारी प्राधान्याची ठिकाणे, अशा विविध प्रकारची सर्वेक्षण केली आहेत. त्यावर आधारित ‘ट्रॅफिक मॉडेलिंग’ करण्यात आले. वैभव टॉकीज-हडपसर, हॅरिस ब्रिज, शनिवारवाडा, गणेशखिंड रस्ता, खराडी बायपास यांसारख्या ठिकाणी प्रचंड वाहतुकीचा ताण असल्याचे या अभ्यासात आढळले आहे. सल्लागार संस्थेने केलेल्या अभ्यासात सात संभाव्य बोगद्यांचा विचार करण्यात आला आहे. त्यापैकी ‘येरवडा-खडी मशिन’ हा उत्तर-दक्षिण पुण्याला जोडणारा प्राधान्य मार्ग म्हणून निश्चित केला आहे. त्याशिवाय, ‘जगताप डेअरी-सिंहगड रस्ता’ आणि ‘येरवडा-हिंजवडी’ हे मार्गही प्रस्तावित आहेत.

 

दरम्यान, पुणे शहरातील कोंडी कमी करण्यासाठी बाह्य आणि अंतर्गत रिंग रोडचं काम सुरू आहे. बाह्य रिंग रोडचं काम पूर्व आणि पश्चिम अशा दोन टप्प्यांमध्ये सुरू आहे. पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. शहराच्या बाहेरून तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गामुळे नागरिकांचा पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे. पुणे रिंग रोडचं काम एकूण 12 पॅकेजेसमध्ये विभागलेलं आहे. यापैकी काही पॅकेजेस पश्चिम तर काही भाग पूर्व भागांत आहे. यापैकी पश्चिमेकडील काम लवकर पूर्ण होणार आहे. संपूर्ण मार्ग 2028पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 173 किमी लांब या मार्गाची योजना सर्वप्रथम 2007मध्ये आखण्यात आली होती. सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1,554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे. MSRDCकडून या प्रकल्पासाठी बांधकाम सुरू आहे.


बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क करा.


 लोकांच्या प्रतिक्रिया


xtreme2day.com
💎 Payment No. 664959 NEXT >> graph.org/The-Best-AI-Sex-Girlfriend-05-11?hs=645bbf92ea71a721651bd7e48f6a32c2& << 💎 29-05-2026 18:28:03

ad02jn


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती